ठाण्याचं तापमान वाढलं, पारा ४४.१ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 06:51 PM2022-03-23T18:51:22+5:302022-03-23T18:51:59+5:30

हवामान विभागाने मुंबई, रायगड, पालघरसह ठाणे जिल्ह्यातही १४ ते १६ मार्च या कालावधीत उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तविला होता.

The temperature in Thane rose to 44.1 degrees Celsius | ठाण्याचं तापमान वाढलं, पारा ४४.१ अंशांवर

ठाण्याचं तापमान वाढलं, पारा ४४.१ अंशांवर

googlenewsNext

ठाणे- गेल्या आठ दिवसांपासून सूर्यनारायण ठाण्यात अक्षरशः आग ओकताना दिस आहे. बुधवारी पुन्हा ठाण्याच्या तापमानाने ४४.१ अंश सेल्सिअसचा आकडा गाठला. हे तापमान पालघर आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यापेक्षा अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकंदरीत ठाण्यात साधारणपणे ३० अंशांपर्यंत तापमान दरवर्षी असते, मात्र यंदा तापमान प्रचंड वाढल्याने ठाणेकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. दुपारी बाहेर फिरण्यापेक्षा ऑफिस आणि घरात राहाणे नागरिकांकडून पसंत केले जात आहे. होळीच्या दिवशीही ठाणे शहराचे तापमान आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच ४५.६ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते.

हवामान विभागाने मुंबई, रायगड, पालघरसह ठाणे जिल्ह्यातही १४ ते १६ मार्च या कालावधीत उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार ठाण्याचा पारा  ३५ अंशाच्या पुढे जाऊ लागला. तो आकडा आता जवळपास ४० अंशाच्या आसपास किंवा त्याच्याही पुढे जाताना वारंवार दिसून येत आहे. हवामान खात्याने म्हटल्या प्रमाणे १६ मार्च ठाण्याचे तापमान हे ४४ अंशावर पोहोचले होते. त्यानंतर ते तापमान कमी होईल, असे वाटत असतानाच दुसऱ्याच दिवशी म्हणजेच होळीच्या दिवशी हे तापमान ४५.६ अंशावर गेले होते. हे आतापर्यंत ठाण्यातील सर्वाधिक तापमान असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. 

या तापमानाची तुलना विदर्भाशी केली गेली. १९ ते २२ मार्च दरम्यानचे तापमान ३५ ते ४० च्या आसपास होते. मात्र त्यातच बुधवारी अचानक तापमान ४४.१ अंशावर गेल्याचे पाहायला मिळाले. ठाणेकर नागरिकांना हा वाढता उकाडा नकोसा झाला आहे. अंगातून घामाच्या धारा वाहत नसल्याने आणि अंगाला चटके लागत असल्याने ऑफिस आणि घरात पंख्याखाली किंवा एसीमध्ये बसने नागरिक पसंत करत आहेत. हे तापमान असेच राहिल्यास एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत जीव नकोसा होईल, अशी भीतीही ठाणेकर नागरिकांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे.
 

 

Web Title: The temperature in Thane rose to 44.1 degrees Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.