ठाणे जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील वीटभट्टी कामगारांच्या मुलांनाही आता राेज मिळणार शिक्षणाचे धडे!

By सुरेश लोखंडे | Published: January 18, 2024 04:16 PM2024-01-18T16:16:35+5:302024-01-18T16:18:09+5:30

एकदिवसीय कार्यशाळा घेऊन त्यांना देण्यात येणाऱ्या धड्याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.

the thane zp children of the brick kiln workers in the district will now get regular education | ठाणे जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील वीटभट्टी कामगारांच्या मुलांनाही आता राेज मिळणार शिक्षणाचे धडे!

ठाणे जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील वीटभट्टी कामगारांच्या मुलांनाही आता राेज मिळणार शिक्षणाचे धडे!

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभाग व सोशल एमपावरमेन्ट अँड व्हॅलेटरी असोसिएशन (सेवा) यांच्या संयुक्त विद्यमाने वीटभट्टीवर काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या मुलांना ‘शिक्षणाचा अधिकार’ अंतर्गत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा महत्वपूर्ण उपक्रम या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मनुज जिंदल यांनी हाती घेतला आहे. त्यासाठी त्यांनी शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्या सहकार्याने भिवंडी येथे जिल्हा परिषदेच्या ८५ शाळांच्या मुख्याध्यापकांची एकदिवसीय कार्यशाळा घेऊन त्यांना या देण्यात येणाऱ्या धड्याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.

जिल्ह्याभरातील गांवखेड्यांमधील वीटभट्टीवरील मुलांनासाठी ‘ब्रीक टू इंक’ हा अभिनव उपक्रम सीईओ यांनी हाती घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील वीटभट्टी वरील स्थलांतरीत मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, वीटभट्टीवर असलेल्या मुलांचे सर्वेक्षण व त्यांचा जवळच्या शाळेत प्रवेश करून त्यांना प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. हा उपक्रम सेवा संस्था ठाणे यांच्याद्वारे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, मुरबाड, शहापूर तालुक्यात राबविण्यात येत आहे. यासाठीची पहिली कार्यशाळा भिवंडी येथील न्यू एरा शाळेत अलिकडेच उत्साहात पार पडली.

वीटभट्टीवरील ही शाळाबाह्य मुले इतर मुलांप्रमाणे शिक्षण घेतील, याकरिता जिल्हा परिषद शाळांच्या मुख्यध्यापकांसोबत सखोल चर्चा करण्यात आली, हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यासाठी सेवा संस्थेचे प्रकल्प व्यवथापक रामेश्वर भाले व वैभव गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या आयोजनात पंचायत समिति भिवंडी गटशिक्षणाधिकारी संजय अस्वले यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: the thane zp children of the brick kiln workers in the district will now get regular education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे