लोकशाहीचा विजय आणि घराणेशाहीचा पराभव; एकनाथ शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टिका

By अजित मांडके | Published: January 11, 2024 03:34 PM2024-01-11T15:34:22+5:302024-01-11T15:34:40+5:30

शिवसेना खरी ही आमची असल्याचेही हे स्पष्ट झाले असून बाळासाहेबांच्या विचारांची आणि कार्यकर्त्यांची असल्यावरही शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

The triumph of democracy and the defeat of dynasticism; Eknath Shinde's criticism of Uddhav Thackeray | लोकशाहीचा विजय आणि घराणेशाहीचा पराभव; एकनाथ शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टिका

लोकशाहीचा विजय आणि घराणेशाहीचा पराभव; एकनाथ शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टिका

ठाणे : लोकशाही मध्ये मेरीटला महत्व असते. लोकसभेत, विधानसभेत आणि पक्ष संघटना बांधणीतही आमचे बहुमत असल्याचे स्पष्ट झाल्यानेच अध्यक्षांनी दिलेला निकाल हा लोकशाहीचा विजय असून घराणेशाहीचा पराभव असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केली. तसेच शिवसेना खरी ही आमची असल्याचेही हे स्पष्ट झाले असून बाळासाहेबांच्या विचारांची आणि कार्यकर्त्यांची असल्यावरही शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना कुणाची याबाबत दिलेल्या निकालानंतर गुरुवारी ठाण्यातील आनंद आश्रम येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी जल्लोष केला. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर सडतोड टिका केली. निकालामुळे आमच्याकडे बहुमत असल्याचे सिध्द झाले असून विरोधकांनी ही चपराक बसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता पक्ष चालवितांना मी पक्षाचा मालक असल्याची मनमानी आता कोणालाही करता येणार नसल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.

लोकशाही निवडणुक एकाबरोबर लढवायची आणि निवडणुकीनंतर दुसºयाबरोबर केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सरकार स्थापन केले.  बाळासाहेबांनी कॉंग्रेसला नेहमी विरोध केला. मात्र त्यांनी कॉंग्रेसला डोक्यावर बसविले, त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले. बाळासाहेबांच्या विचार केवळ एका खुर्चीसाठी सोडले त्यांना हा निकाल एक ही मोठी चपराक असल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचाराचे सरकार स्थापन केले आहे.

भरत गोगवले आमचे प्रतोद आहेत, त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. उबाठा गटाकडे संघटनात्मक बहुमत आहे, अशा प्रकारचा कोणताही पुरावे ते देऊ शकले नाहीत. त्यात गोगावले यांनी उबाठा गटाचे आमदार अपात्र करावे ही याचिका अध्यक्षांकडे केली होती. मात्र ती का फेटाळण्यात याची कारणे आम्हाला माहित नाही. विरोधी आमदारांच्या अपात्रेबाबत आम्ही कायदेतज्ञांबरोबर चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. निकालनंतर अध्यक्षांबाबत केलेले भाष्य हे अतिशय खालच्या पातळीवरील होते.

सर्वोच्य न्यायालयाला देखील सल्ला देण्याचे काम या मंडळींनी केले. मात्र आता स्वत:च मालक म्हणून काहीही निर्णय घेता येणार नाही, एकाधिकारशाही, घराणेशाहीला आलेला निर्णय हा चपराक असल्याचेही त्यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सर्व घटनेनुसार चालत होते, मात्र त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मनमानी कारभार करुन स्वत:च्या स्वार्थासाठी घटनाच पायदळी तुडविण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मागितले होते. मात्र उध्दव ठाकरे यांनी स्वत:चे नाव दिले यावरुन कळायला हवे त्यांनी काय पाहिजे ते असेही ते म्हणाले. शिवसेनेच्या खात्यातील पैसे मागण्याचे पापही देखील त्यांनी केला असेही ते म्हणाले. एकूणच आलेला निकाल हा एक प्रकारचा माईलस्टोन असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

Web Title: The triumph of democracy and the defeat of dynasticism; Eknath Shinde's criticism of Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.