ऑनलाईन फसगत झालेल्या दोघांना मिळाले पैसे

By धीरज परब | Published: March 25, 2024 07:33 PM2024-03-25T19:33:54+5:302024-03-25T19:34:07+5:30

काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत राहणारे सौरभ यांना त्यांच्या क्रेडीट कार्डाचे व्यवहार चालू ठेवायचे असल्यास मोबाईलवर पाठविलेल्या लिंकमध्ये क्रेडिट कार्डाची माहिती भरावयास सांगितली.

The two who were cheated online got money in miraroad | ऑनलाईन फसगत झालेल्या दोघांना मिळाले पैसे

ऑनलाईन फसगत झालेल्या दोघांना मिळाले पैसे

मीरारोड - ऑनलाईन फसवणूक झालेल्या दोघांना सायबर पोलिसांनी फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून दिली आहे. 

काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत राहणारे सौरभ यांना त्यांच्या क्रेडीट कार्डाचे व्यवहार चालू ठेवायचे असल्यास मोबाईलवर पाठविलेल्या लिंकमध्ये क्रेडिट कार्डाची माहिती भरावयास सांगितली. तक्रारदार यांनी माहिती भरुन पाठवली असता त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यात आले. फसवणूक रक्कम नोडल ऑफिसर क्रेडिट कार्ड इंडिसइंड बँकेच्या मर्चड च्या अकाऊंटवर गेल्याचे दिसून आले. पत्रव्यवहार करून फसवणूक रक्कम थांबविण्यात आली. २ लाख १० हजार १६८ रुपये पुन्हा तक्रारदार यांना मिळवून देण्यात आले.  

दुसरी घटना देखील काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील असून शबाना यांच्या क्रेडीट कार्डाचे रिडीम पॉईंट खात्यात जमा करावयाचे असल्याचे सांगितले. त्यानंतर शबाना यांनी आलेला ओटीपी दिल्याने त्यांची आर्थिक फसवणूक केली गेली . फसवणूक झालेली रक्कम पायु पेमेंट्स हौसिंगच्या अकाऊंटवर गेल्याचे दिसून आले. सायबर पोलीस पोलिसांनी तपास करून १ लाख १ हजार ४९६  रुपये शबाना यांना मिळवून दिले. 

पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहायक निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर सह अमीना पठाण, सुवर्णा माळी, माधुरी धिडे, राहुल बन, कुणाल सावळे, मसुबचे राजेश भरकडे, आकाश बोरसे यांनी सदर गुन्ह्याचा तपास चालवला होता.

Web Title: The two who were cheated online got money in miraroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.