मुख्यमंत्र्यांमधील 'कार्यकर्ता' दिसला, खाली पडलेल्या महिला पोलिसाला स्वत: दिलं पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 08:19 PM2022-07-06T20:19:15+5:302022-07-06T20:20:26+5:30
CM Eknath Shinde : ही बाब मुख्यमंत्री शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित तिकडे धाव घेतली आणि आणि पाणी देखील दिलं.
ठाणे : मुख्यमंत्री पदाची शप्पथ घेतल्यांनंतर त्या पासून एकनाथ शिंदेच्या साधेपणाची चर्चा सर्वांना ऐकायला मिळाली आहे. शिंदेचा हाच साधेपणा पुन्हा एकदा पाहायला मिळाला, जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बैठक आटोपल्यानंतर शिंदे निघत असताना महिला पोलीस शिपाई रुपाली साळुंखे यांचा तोल गेल्याने मुख्यमंत्र्यांच्या समोरच त्या कोसळल्या आणि त्याच्या हाताला दुखापत झाली. ही बाब मुख्यमंत्री शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित तिकडे धाव घेतली आणि आणि पाणी देखील दिलं. त्या महिला पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्याची सूचना दिली.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रथमच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. जिल्यातील आपत्ती आणि व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयावर बैठक घेण्यात आली. दुपारी ३ वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले तब्बल ३ तास बैठक घेऊन शिंदे आपल्या पुढच्या नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना रुपाली साळुंखे या जमिनारीवर पडल्या, त्याचा तोल गेल्याने काही सुचण्याआधी त्या पडल्या.
मुख्यमंत्र्यांकडून महिला पोलिसांची विचारपूस ! pic.twitter.com/Czc0OQlz0z
— Lokmat (@lokmat) July 6, 2022
या प्रकरणाची दखल स्वतः शिंदे यांनी घेत त्यांना पाणी दिले, आणि त्यांच्या कार्यकर्त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करा अशी सूचना दिली. मुख्यमंत्र्यांनी दाखववेलेल्या त्याच्या साधेपणामुळे महिला पोलिसांकडून कौतुक करण्यात आले.