त्या तरुणचा मृतदेह ७६ तासांनी आढळला; रेतीबंदर येथील खाडीमध्ये सापडला
By कुमार बडदे | Published: July 1, 2023 11:50 PM2023-07-01T23:50:02+5:302023-07-01T23:50:10+5:30
पावसाच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहा बरोबर गुरुवारी दुपारी तो वाहून गेला होता.
मुंब्राः शिळफाटा भागातील एम.एस.कंपाऊंड परीसरातील नाल्यामध्ये वाहून गेलेल्या वसीम सय्यद या १७ वर्षाच्या तरुणाचा मृतदेह तब्बल ७६ तासांनी रेतीबंदर येथील खाडीमध्ये आढळून आला. नविन भाड्याने घेतलेल्या घरामध्ये जुन्या घरातील सामान नेण्यासाठी जात असताना नाल्यावरुन वहात असलेल्या पावसाच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहा बरोबर गुरुवारी दुपारी तो वाहून गेला होता.
याबाबतची माहिती त्याच्या कुटुंबाने त्या दिवशी रात्री पावणेनऊ वाजता शिळ अग्निशमन केंद्रातील जवानांना दिली होती .जवानांनी गुरुवारी रात्री दीड तास आणि शुक्रवारी तीन तास त्याचा संभावित ठिकाणी शोध घेतला होता.परंतु तो आढळून न आल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होता.शनिवारी संध्याकाळी त्याचा मृतदेह मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांना रेतीबंदर खाडी वरील नवीन रेल्वे पुलाखाली आढळला.त्यांनी तो खाडी बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. असून, पोलिसांनी कायदेशीर कार्यवाही करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला.