"वंचितांचा रंगमंच हे समाजाचे व कलाविश्वाचे वैभव " - ज्येष्ठ नाट्यकर्मी जयंत सावरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 04:33 PM2019-12-30T16:33:39+5:302019-12-30T16:37:00+5:30

ठाण्यात वंचितांचे रंगमंचचे सहावे पर्व पार पडले. 

"Theater of the underprivileged is the glory of society and the arts" - Senior playwright Jayant Savarkar | "वंचितांचा रंगमंच हे समाजाचे व कलाविश्वाचे वैभव " - ज्येष्ठ नाट्यकर्मी जयंत सावरकर

"वंचितांचा रंगमंच हे समाजाचे व कलाविश्वाचे वैभव " - ज्येष्ठ नाट्यकर्मी जयंत सावरकर

googlenewsNext
ठळक मुद्दे"वंचितांचा रंगमंच हे समाजाचे व कलाविश्वाचे वैभव " - जयंत सावरकरवंचितांचे रंगमंचचे सहावे पर्व समता विचार प्रसारक संस्था, व बालनाट्य पुरस्कृत वंचितांचा रंगमंच

ठाणे : वंचित समुहांना आपल्या भावना, समस्या व समज, आपल्या भाषेत व शैलीत व्यक्त करण्याची संधी देणारा वंचितांचा रंगमंच हे आपल्या समाजाचे व कला विश्वाचे वैभव आहे. असे मत ज्येष्ठ नाट्यकर्मी जयंत सावरकर यांनी व्यक्त केले.  समता विचार प्रसारक संस्था, व बालनाट्य पुरस्कृत वंचितांचा रंगमंचच्या माध्यमातून आयोजित " युवा नाट्यजल्लोष "च्या सहाव्या पर्वात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.

       त्या अभिव्यक्तीचा लाभ सर्वसामान्य जनतेस मुक्त हस्ते व मोफत उपलब्ध करून देणारी समता विचार प्रसारक व बालनाट्य संस्था फार मोलाचे कार्य करीत असून, त्यात सर्वांनी सामील व्हायला हवे.असे नमुद करत ते पुढे म्हणाले, माझेही यंदा इथे येणे हे पहिले असले तरी शेवटचे असणार नाही.यावेळी युवा नाट्य जल्लोष मध्ये पाच नाटिका सादर करण्यात आल्या : मैट्रो आणि वृक्षकत्तल या विषयावर आधारित 'गोष्ट जीवाची ' (किशननगर गट), 'दृष्टीकोन' (सावरकर नगर गट), 'एचआयव्ही- एड्स' (ठाणे शहर गट), महिला सक्षमता आणि निर्भयता या विषयांवर 'निर्भय मी- सक्षम मी' (मानपाडा गट), 'हम सब' (माजिवडा गट). या नाटिकांबद्दल बोलतांना ज्येष्ठ कवि अरूण म्हात्रे म्हणाले, वंचितांचा रंगमंच हा साधा सहज आणि सर्वाना सामावून घेणारा मंच आहे. "अनेक वर्षे निरपेक्ष पणे संतांच्या लोकवस्तीत शैक्षणिक- सांस्कृतिक कार्य करणारा वंचितांचा रंगमंच हे ठाण्याचे भुषण आहे. ठाणे महापालिका या चळवळीला भरघोस सहकार्य करेल. असे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के या प्रसंगी बोलतांना म्हणाले. शहरभर दिवसभर अनेक कार्यक्रमांची रेलचेल असतांनाही मा. महापौर या वेळी आवर्जून उपस्थित राहिले होते. लघुपट निर्माते प्रा. संतोष पाठारे म्हणाले, " वंचिताचा रंगमंच हा केवळ ठाण्यातील वस्तीत राहणाऱ्या मुलांच्या कलागुणांना वाव देणार व्यासपीठ न राहता समाजापर्यंत आपले विचार पोहचवणारी चळवळ झाला आहे.रत्नाकर मतकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या वंचितांच्या रंगमंचावर गेली सहा वर्षे मुलांच्या नाटिका बघण्याच्या निमित्ताने समविचारी माणसं एकत्र येतात, विचार मंथन होते हे खूप महत्त्वाचे आहे. या वेळी वैदेही भिडे (मनो विकास संस्था - IPH) माधुरी वारियत (जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय) यानी ही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या संयोजिका हर्षदा बोरकर यांनी सूत्र संचालन केले. दिपक वाडेकरने पाहुण्यांची ओळख करून दिली. सह संयोजक अनुजा लोहारने आभार प्रदर्शन केले. या वेळी कार्यक्रमात डॉ. निर्मोही फडके, नीलिमा सबनीस, शैलेश भिडे, हर्षल सुतार, शिवाजी पवार, जगदीश खैरालिया, उमाकांत पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते. ठाणे आर्ट गिल्ड चे योगेश खांडेकर आणि सुनिता फडके व समता विचार प्रसारक संस्थेचे लतिका सु. मो., हर्षलता कदम, मनिषा जोशी, सुनील दिवेकर, कल्पना भांडारकर, विश्वनाथ चांदोरकर, प्रवीण खैरालिया, हेमाली शिंदे, निखिल दंत, आतेश शिंदे, इनाॅक कोलियार, ओंकार जंगम, दर्शन पडवळ, गौतमी सिन्गारे, स्नेहा राठोड, पल्लवी कदम आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.  

Web Title: "Theater of the underprivileged is the glory of society and the arts" - Senior playwright Jayant Savarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.