नोकराने केलेली चोरी उघड, आरोपीला मध्यप्रदेश येथून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 18:42 IST2025-03-02T18:41:54+5:302025-03-02T18:42:05+5:30
याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती.

नोकराने केलेली चोरी उघड, आरोपीला मध्यप्रदेश येथून अटक
नालासोपारा (मंगेश कराळे ) :- आयुर्वेदिक पंचकर्म सेंटरमधील नोकराने लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने, मोबाईल आणि घड्याळ चोरून नेले होते. या आरोपी नोकराला मध्यप्रदेशच्या खांडवा नालासोपाऱ्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केले आहे.
बोरिवली येथील खुशल हेरिटेज टॉवरमध्ये राहणारे समाजसेवक प्रदीप गुप्ता (45) हॆ नालासोपारा पश्चिमेकडील सुखाआंगण सोसायटीतील डॉ. सर्व्हेश्वर शर्मा यांच्या वेदस आयुर्वेदिक पंचकर्म सेंटरमध्ये 25 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता पंचकर्म उपचारासाठी गेले होते. आयुर्वेदिक पंचकर्म सेंटरमधील रूममध्ये त्यांनी अंगावरील सोन्याचे दागिने, रोख रक्कम मोबाईल आणि घड्याळ असा एकूण 17 लाख 5 हजारांचा मुद्देमाल सेंटरमधील आरोपी नोकर राकेश पांडेय (32) याने चोरून नेला होता. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठानी नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अधिकारी व अंमलदारांना तात्काळ गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी घटनास्थळावरील व परिसरातील सीसीटीही फुटेज पाहुन आरोपी राकेशचा शोध सुरु केला. आरोपी हा मोबाईल मधील सीम कार्ड बदलत गावी जात असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासात सातत्य ठेवून केलेल्या अथक प्रयलानंतर आरोपीच्या मोबाईल फोनच्या तांत्रिक विश्लेषनावरून व ठिकठिकाणच्या ५० सीसीटीव्हीची पडताळणी केल्यानंतर आरोपी हा त्याचे मुळ गावी रेल्वेने पळुन जात होता. त्याला 28 फेब्रुवारीला खांडवा, मधप्रदेश येथुन ताब्यात घेण्यात आले. आरोपीची अंगझडती घेतली असता आरोपीकडे गुन्ह्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम मोबाईल आणि घड्याळ असा एकूण 17 लाख 5 हजारांचा मुद्देमाल मिळून आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहा. पो.आयुक्त विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी, पोलीस निरीक्षक अमरसिंह पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र चंदनकर, पोउपनि योगेश मोरे, पोहवा प्रशांत साळुंके, अमोल तटकरे, कल्याण बाचकर, राजेश नाटूलकर, प्रेम घोडेराव, प्रताप शिंदे, बाबा बनसोडे, सोहेल शेख यांनी केली आहे.