भिवंडीत ४४ लाखांच्या महागड्या केमिकल पावडरची चोरी
By नितीन पंडित | Published: February 3, 2024 07:10 PM2024-02-03T19:10:47+5:302024-02-03T19:11:01+5:30
हे ड्रम हिमाचल प्रदेश येथील चार कंपन्यांमध्ये पाठविण्यात आले होते.
भिवंडी: तालुक्यातील राहनाळ येथील गोदामातून हिमाचल प्रदेश येथे विविध कंपन्यांसाठी पाठविण्यात साठी गोदामात ठेवलेल्या ४४ लाख ५९ हजार ६६३ रुपये किंमतीची महागड्या केमिकल पावडरची चोरी झाल्याचा प्रकार १६ ऑक्टोबर २०२३ ते ३ नोव्हेंबर २०२३ यादरम्यान राहनाळ ते हिमाचल प्रदेश मधील विविध ठिकाणी घडला आहे. याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकाने नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.
अंजूर फाटा राहनाळ येथील कस्तुरी कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलातील ग्लोबल वेअर हाऊस मध्ये महागड्या केमिकल पावडर चे १६ ड्रम ठेवण्यात आले होते. हे ड्रम हिमाचल प्रदेश येथील चार कंपन्यांमध्ये पाठविण्यात आले होते. मात्र या १६ ड्रमपैकी १३ ड्रमचे झाकण खोलून अज्ञात इसमाने ४४ लाख ५९ हजार ६६३ रुपये किमतीचा महागडी पावडर काढून त्या जागी वेगळीच बनावट पावडर टाकून महागडी केमिकल पावडर चोरून नेली. याप्रकरणी कंपनीचे मॅनेजर सुरेश पाटील यांनी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.