गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यालयातून टीव्ही संचासह चार लाखांच्या ऐवजाची चोरी

By जितेंद्र कालेकर | Published: March 20, 2023 08:05 PM2023-03-20T20:05:36+5:302023-03-20T20:05:42+5:30

वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा: डायमंड गँगवर संशय

Theft of Rs 4 lakhs including TV set from office of Gunaratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यालयातून टीव्ही संचासह चार लाखांच्या ऐवजाची चोरी

गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यालयातून टीव्ही संचासह चार लाखांच्या ऐवजाची चोरी

googlenewsNext

ठाणे: वागळे इस्टेट येथील झेन ग्रृपच्या मेकॅनिकल युनिटच्या गेटचे लॉक तोडून चोरटयांनी वातानुकूलित यंत्रणेसह टीव्ही आणि वॉशिंग मशिन असा चार लाख २५ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील यांनी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे.

अॅड. सदावर्ते यांचे ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात इंजिनियरिंग युनिटचे कार्यालय आहे. याच कार्यालयात १९ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी गेटचे लॉक तोडून आत शिरकाव केला. त्यांनी कार्यालयातील अॅल्युमिनियम स्लाईडींगसह इतरही वस्तूंची चोरी केली. याप्रकरणी सदावर्ते दाम्पत्याने तक्रार दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. व्ही. जोंधळे हे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, ही चोरी डायमंड गँगने केल्याचा संशय अॅड. सदावर्ते यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केला.

Web Title: Theft of Rs 4 lakhs including TV set from office of Gunaratna Sadavarte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.