ठाण्यातील घरातून सहा लाख ५५ हजारांच्या ऐवजाची चोरी; वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा, उन्नती गार्डनमधील प्रकार
By जितेंद्र कालेकर | Updated: August 22, 2024 22:18 IST2024-08-22T22:17:16+5:302024-08-22T22:18:07+5:30
सहायक पोलिस निरीक्षक एम. आर. होळकर गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

ठाण्यातील घरातून सहा लाख ५५ हजारांच्या ऐवजाची चोरी; वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा, उन्नती गार्डनमधील प्रकार
ठाणे : वर्तकनगर, उन्नती गार्डन भागातील स्वप्नील महेश राऊत (वय ३३) या व्यापाऱ्याच्या घरातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा सहा लाख ५५ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी गुरुवारी दिली.
देवदया नगर समोरील परिसरात असलेल्या उन्नती गार्डनमध्ये २१ जून २०२४ रोजी रात्री १०.१५ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान राऊत यांच्या घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड चोय्ला गेल्याचा प्रकार २१ ऑगस्टला निदर्शनास आला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक एम. आर. होळकर गुन्ह्याचा तपास करीत आहेत.