सॅनिटायझरच्या बहाण्याने चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:43 AM2021-04-23T04:43:11+5:302021-04-23T04:43:11+5:30
----------------------------------------- काेराेनाने २४ तासांत नऊ जणांचा मृत्यू कल्याण : कल्याण-डोंबिवलीत गुरुवारी कोरोनाचे एक हजार ६७० नवे कोरोना रुग्ण ...
-----------------------------------------
काेराेनाने २४ तासांत नऊ जणांचा मृत्यू
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत गुरुवारी कोरोनाचे एक हजार ६७० नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजार ६५० रुग्णांना उपचाराअंती बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्या रुग्णांची भर पडल्याने सध्या १४ हजार २५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी कल्याण पूर्वेत ३६७, डोंबिवली पूर्वेत ४६०, कल्याण पश्चिमेत ५१३, डोंबिवली पश्चिमेला १९७, मांडा-टिटवाळा १०६, मोहना २१ तर पिसवलीत सहा नवे रुग्ण आढळले आहेत.
-----------------------------------------
दुचाकीची चोरी
डोंबिवली : पिसवली परिसरातील बंगाली चाळीत राहणारे राधेशाम गुप्ता यांनी त्यांची दुचाकी त्यांच्या किराणा दुकानासमोर शनिवारी पार्क केली होती. तेथून ती गाडी मध्यरात्री चोरीला गेली. याप्रकरणी गुप्ता यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
-----------------------------------------
२१ हजारांची रोकड चोरीला
डोंबिवली : ग्राहकांना वितरित करण्यासाठी दिलेल्या २६ गॅस सिलिंडरमधून मिळालेली २१ हजार ४७ रुपयांची रोकड नोकर समीर शेख याने लंपास केल्याची घटना पश्चिमेतील अंबिकानगर परिसरात बुधवारी घडली. याप्रकरणी गॅस सिलिंडर वितरक विश्वंभर पैठणे यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शेख याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
------------------------------------------
किरकाेळ कारणाने मारहाण
डोंबिवली : पूर्वेतील शेलारनाका, त्रिमूर्ती चौक येथील किराणा दुकानाच्या मागे गुरुवारी दुपारी चंद्रकांत जामदार, चंद्रकांत शेलार आणि मारुती कांबळे यांनी धनराज छापरवाल यांच्या मोबाइलमध्ये बॅलन्स नसल्याच्या रागातून त्याला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून जामदार, शेलार आणि कांबळे यांच्याविराेधात गुन्हा नोंद झाला आहे.
-------------------------------------------