थीम पार्कच्या ठेकेदारांनी अखेर भरली ३२ लाखांची रॉयल्टी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 01:20 PM2022-01-07T13:20:46+5:302022-01-07T13:21:16+5:30
Thane : अखेर यापूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर ठाणे महापालकेने हालचाल केल्यानंतर अखेर ३२ लाखांची रॉयल्टी जमा केली असली तरी ही रॉयल्टी नेमकी किती होती याबाबत मात्र साशंकता आहे.
ठाणे : थीमपार्कसाठी अनधिकृतने उत्खनन करून रॉयल्टी बुडवणाऱ्या ठेकेदारांनी अखेर ३२ लाखांची रॉयल्टी भरली आहे. उत्खनन करताना संबंधित ठेकेदाराने कोणत्याही प्रकारची परवानगी घेता उत्खनन केले होते. त्यानंतर तहसिदार कार्यालयाच्या मार्फत ठाणे महापालिकेला पत्र पाठवूनही ठाणे महापालिकेने या ठेकेदारावर कारवाई केली नव्हती. अखेर यापूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर ठाणे महापालकेने हालचाल केल्यानंतर अखेर ३२ लाखांची रॉयल्टी जमा केली असली तरी ही रॉयल्टी नेमकी किती होती याबाबत मात्र साशंकता आहे.
भ्रष्टाचाराचे कुरण ठरलेल्या जुने ठाणे नवीन ठाणे या थीम पार्कसाठी अनधिकृतपणे उत्खनन झाले असल्याची बाब यापूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये उघड झाली होती. विशेष म्हणजे अनधिकृतपणे उत्खनन करणाऱ्यावर कारवाई करून रॉयल्टीची दंडासहित वसुली करावी यासाठी ठाणे महापालिकेला तहसिलदारांनी दोन वेळा पत्र देऊनही ठाणे पालिकेने अद्याप कोणत्याच प्रकारची कारवाई केलेली नव्हती. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी यासंदर्भात स्थायी समितीच्या बौठकीत प्रश्न उपस्थित केला होता.
जुने ठाणे आणि नवीन ठाणे या थीम पार्कसाठी करण्यात आलेले उत्खनन देखील अनधिकृतपणे करण्यात आले असल्याची बाब त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये निदर्शनास आणली होती . यासंदर्भात आपण ठाणे महापालिकेला आठ महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार देखील केला असल्याचे मिलिंद पाटणकर यांनी या बैठकीत सांगितले होते. यासंदर्भात तहसीलदारांनी ठाणे महापालिकेला पत्र दिले असून संबंधित ठेकेदाराकडून दंडासहित रॉयल्टी वसूल करून कारवाई करण्यात यावी असे या पत्रात नमूद केले असताना ठाणे महापालिकेने ठाणे महापालिकेने यासंदर्भात काहीच कारवाई केली नव्हती.
जुने ठाणे नवीन ठाणे थीम पार्कसाठी उत्खनन करणाऱ्या संबंधित ठेकेदाराने शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अनधिकृतपणे उत्खनन केले असून शासनाची कोट्यवधीची रॉयल्टी बुडवली असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. बाळकूम मंडल अधिकाऱ्यांनी स्वतः जाऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी केल्यानंतर सादर ठिकाणी थीम पार्कचे काम पूर्ण झाले होते. तसेच तसेच संबंधित ठेकेदाराने गौखनिज संदर्भात स्वामित्वाची रक्कम ठाणे महापालिकेकडे जमा केली आहे का? काम झाल्यापासून किती गौणखनिज खरेदी केले? ते कुठून आणले अशी विचारणा ठाणे पालिकेला पत्राद्वारे करण्यात आली होती.