..तर महाभारताचा शेवट अप्रतिम झाला असता-अशोक समेळ  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 05:23 PM2018-06-25T17:23:04+5:302018-06-25T17:23:23+5:30

माणसाने माणसाला क्षमा केली पाहिजे असे मला वाटते, असे झाले असते तर व्यासांनी लिहिलेल्या महाभारताचा शेवट अप्रतिम झाला असता

then the end of Mahabharata would have been wonderful - Ashok Samel | ..तर महाभारताचा शेवट अप्रतिम झाला असता-अशोक समेळ  

..तर महाभारताचा शेवट अप्रतिम झाला असता-अशोक समेळ  

Next

डोंबिवली- अश्र्वत्थामा हा एक आशावाद असतो. आदर्शवाद हा कधी कधी अजीर्ण होतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की ती गोष्ट विकृतीकडे वळते. तसाच अश्र्वत्थामा हा शेवटी विकृतीकडे वळला. मारणो व सूड घेणो ही वृत्ती नसावी. माणसाने माणसाला क्षमा केली पाहिजे असे मला वाटते, असे झाले असते तर व्यासांनी लिहिलेल्या महाभारताचा शेवट अप्रतिम झाला असता, असे मत लेखक अशोक समेळ यांनी व्यक्त केले.
    चतुरंग प्रतिष्ठान प्रस्तुत मुक्तसंध्या या उपक्रमांतर्गत अश्र्वत्थामा या गाजलेल्या कादंबरीवर आधारीत ‘मी.अश्र्वत्थामा..चिरंजीव!’ अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्यांनी प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी समेळ बोलत होते. हा कार्यक्रम सुयोग मंगल कार्यालयात रविवारी पार पडला. लेखक,दिग्दर्शक अभिनेता आणि निर्माता असलेले अशोक समेळ आणि संजीवनी समेळ यांनी अभिवाचन केले. 
    समेळ म्हणाले की, शिवाजी सावंत यांनी कल्पनेतून अश्र्वत्थामा रंगविला आहे कारण कादंबरी ही वाचनीय झाली पाहिजे. अश्र्वत्थामाचा प्रवास विलक्षण आहे. कादंबरी वाचल्यावर अश्र्वत्थामा काय आहे ते तुम्हाला समजेल. ही कादंबरी लिहीताना मी 21 वर्षे अभ्यास केला आहे. व्यासाचे 18 खंड, गाडगीळचा दस्तऐवज तसेच या विषयावर पीएचडी करणा:या स्नेहलता देशमुख यांचा प्रबंध या सगळ्य़ाचा अभ्यास केला आहे. त्यानंतर ही 700 पानांची कादंबरी लिहीली आहे. या कादंबरीत माङया कल्पनाशक्तीचा आविष्कार आहे. ही 5 हजार वर्षापूर्वीची कादंबरी आजचा वर्तमान, भाविष्य, आणि भूतकाळ वापरून ऑथेटिक करण्याचा प्रयत्न केला आहे. माङया पुस्तकांच्या पाच आवृत्ती निघाल्या आहेत. त्यांच्या प्रकाशनाला शास्त्रज्ञ डॉ. रघूनाथ माशेलकर आले होते. हे पुस्तक विज्ञानाशी संदर्भ जोडणारे आहे असे उद्गार त्यानी त्यावेळी काढले होते, असे ही त्यांनी सांगितले.
    मी कधी लेखक होईन असे मला वाटले नव्हते. माङया डोक्यात क्रि केट होते. आता नवीन गुजराती नाटक येत आहे. नाटक लिहिणो हे सगळे पोटापाण्यासाठी करतो. पण ही पुस्तके वाचून प्रत्येकाला आनंद मिळावा, त्यांना त्यातून काहीतरी मिळावा हा उद्देश आहे. माङयाकडून हा ग्रंथ लिहून घेतले असल्याचे समेळ म्हणाले.
    संजीवनी समेळ म्हणाल्या,  नाटक लिहीताना त्यांची पाठ दुखते अश्या तब्येतीच्या कुरकुर सुरू असतात. मात्र अश्र्वत्थामा ही कादंबरी लिहिताना ते सकाळी 9 ते रात्री 10 वाजेर्पयत बसत असत. तरीही त्यांच्या चेह:यावर उत्साह होता. अश्र्वत्थामा प्रत्यक्षात भेटला नसता तर हे शक्य झाले नसते असे मला वाटते.

Web Title: then the end of Mahabharata would have been wonderful - Ashok Samel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.