...तर कागज नही दिखाएंगे सत्याग्रहाचा युवकांचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 01:02 AM2020-02-04T01:02:12+5:302020-02-04T01:02:35+5:30
ठाण्यात रंगला युवा टॉक शो
ठाणे : भारतीय संविधानाने राणीच्या पोटातून जन्म घेणाऱ्या राजाची राजेशाही व संस्थानिकांची मनमानी संपवून देशातील जनतेला समान हक्क देऊन विषमतेतून मुक्तीची वाट दाखवली आहे. त्यामुळे संविधानातील लोकशाही, स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांच्या रक्षणासाठी, युवा रस्त्यावर उतरले आहेत. न्यायालयाने न्याय दिला तर ठीकच, नाहीतर महात्मा गांधींच्या शिकवणुकीनुसार, नागरिकता दुरु स्ती कायदा हा धर्माधारित भेदभाव करणारा आणि संविधानाच्या आत्म्याशी फारकत घेणारा असल्याने, त्या विरु द्ध ‘कागज नहीं दिखाएंगे’ हा सत्याग्रहही युवक करतील, असा इशारा युवा टॉक शो मध्ये युवकांनी दिला.
महात्मा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त संविधान, नागरिकता व युवकांचे हक्क या विषयावर समता विचार प्रसारक संस्था आणि म्यूज फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ होते. यावेळी चर्चेत युवक म्हणाले की, देशातील नागरिकांकडून पुरावे मागणे हे गोरगरीब, प्रकल्पग्रस्त, आदिवासी आदींसाठी जिकिरीचे ठरू शकते. केवळ राष्ट्रध्वजाचा किंवा राष्ट्रगीताचा मान म्हणजे भारतीयत्व नाही, तर आपापल्या जबाबदाºया नेकीने पार पडणे, भ्रष्टाचार, अन्याय न करणे हे खरे भारतीयत्व आहे. नागरिकता कायदा दुरुस्ती प्रस्ताव मंजूर करताना, त्यावर संसदेत व संसदेबाहेर साधकबाधक चर्चा होणे अत्यावश्यक होते.
विद्यमान सरकारने रोजगाराचा हक्क डावलला
युवकांचे चांगले शिक्षण घेण्याचा, शिक्षण पूर्ण झाल्यावर रोजगार मिळवण्याचा हक्क विद्यमान सरकारने डावलला असून त्याविरु द्ध युवक आंदोलन करत आहेत. देशातील वाढती महागाई, सार्वजनिक उद्योग सावरणे, विकासाचा दर सुस्थितीत राखणे हे सरकारला जमत नसल्यामुळे नागरिकता कायदा दुरु स्ती आणि त्यापाठोपाठ येऊ घातलेले नागरिक नोंदणी आणि जनसंख्या नोंदणी हेही अनावश्यक असल्याचे मत आसामच्या विशिष्ट परिस्थितीचा दाखल देऊन या युवकांनी मांडले. प्रथमेश्वर उंबरे, कपिल खंडागळे, जुही शहा, रिंकल भोईर, यश माडगावकर, सोनू गुप्ता, सर्वेश अकोलकर आणि नीरज आठवले या विद्यार्थी- युवकांनी टॉक शोमध्ये आपली मते मांडली.