...तर सर्वच नगरसेवकांवर कारवाई करा, राष्ट्रवादीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 04:38 AM2018-11-14T04:38:13+5:302018-11-14T04:38:44+5:30
राष्ट्रवादीची मागणी : आयुक्तांना दिले पत्र
ठाणे : ठाणे महानगर पालिकेमधील अनेक नगरसेवकांच्या विरोधात महाराष्ट्र प्रांतिक अधिनियम १९४९ च्या कलम १० (१ड ) अन्वये कारवाई करण्यासंदर्भात तक्र ारी केल्या आहेत. मात्र, मोरेश्वर किणी यांच्यावर ज्या प्रमाणे कारवाई केली तशीच ज्यांच्या विरोधात तक्र ारीं आहेत, त्यांच्यावरही करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. राजकीय दबावापोटी त्यांच्यावर ती केली जात नसल्याचा आरोपही त्यांनी आयुक्तांवर केला आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर किणे यांच्यावर अनधिकृत बांधकामांचा ठपका ठेऊन त्यांचे सदस्यत्त्व रद्द केले आहे. या सांधर्भात परांजपे यांनी निवेदनाद्वारे सर्वांना एकच नियम लागू करण्याची मागणी केली आहे. या निवेदनानुसार, ठाणे शहरात ज्या नगरसेवकांनी अनधिकृतपणे बांधकामे केली आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र प्रांतिक अधिनियम १९४९ च्या कलम १० (१ ड ) अन्वये त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच न्यायालयानेही या नगरसेवकांवर कारवाई करणे तसेच पद रद्दतेची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
राजकीय दबावापोटी ही कारवाई केली जात नाही. त्यामुळे आयुक्तांनी ज्यांच्या विरोधात तक्र ारी आहेत, त्या सर्व नगरसेवकांचे पद रद्द करावे, अशी मागणी केली आहे. संविधानातील निर्देशानुसार महाराष्ट्र प्रांतिक अधिनियमाची अंमलबजावणी करणे आयुक्तांचे काम आहे. संविधानाच्या तत्त्वानुसार सर्वांना समान न्याय हवा. याचा विचार करून ज्यांनी अनधिकृत बांधकामे केली आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यास त्यांनी सांगितले.