कल्याण-कसारा मार्गावर वाढीव लोकलफेऱ्या नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:28 AM2019-03-01T00:28:11+5:302019-03-01T00:28:13+5:30

अधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती : आजचे आंदोलन स्थगित

There are no local trains on the Kalyan-Kasara route | कल्याण-कसारा मार्गावर वाढीव लोकलफेऱ्या नाहीत

कल्याण-कसारा मार्गावर वाढीव लोकलफेऱ्या नाहीत

Next

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील तिसºया रेल्वेमार्गिकेचे सर्वेक्षण पूर्ण झाले असले, तरीही त्या मार्गाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. तोपर्यंत त्या मार्गावर एकही नवी लोकलफेरी देता येणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण सहवाणिज्य अधिकारी रॉबिन कालिया यांनी गुरुवारी दिले. अधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणानंतर उद्या (शुक्रवारी) करण्यात येणारे आंदोलन प्रवासी संघटनेने स्थगित केले.


कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन या प्रवासी संघटनेच्या पदाधिकाºयांसमवेत बुधवारी मुंबई रेल्वे अधिकाºयांची बैठक झाली. दि. १ मार्च रोजी करण्यात येणारे आंदोलन संघटनेने मागे घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच त्यानिमित्ताने प्रवासी संघटनेने केलेल्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. परिचालन विभागाचे अधिकारी शिवाजी सुतार हेही उपस्थित होते. कल्याण-कसारा मार्गावर तांत्रिक मुद्यांमुळे अनेक कामे प्रलंबित आहेत. एमआरव्हीसीकडे त्या लाइनचे काम असून संघटनांनी त्यांच्याकडेही पाठपुरावा करावा, असे आवाहन सुतार यांनी केल्याचे संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र विशे यांनी सांगितले. संघटनेच्या सल्लागार अनिता झोपे, प्रसिद्धिप्रमुख शैलेश राऊत यांच्यासमवेत अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.


आसनगाव स्थानकातील जुन्या पादचारी पुलाची डागडुजी अलीकडेच करण्यात आली असली, तरी त्यात तांत्रिक चुका झाल्याकडे विशे यांनी लक्ष वेधले. त्यावर अधिकाºयांनी सांगितले की, पुलाच्या कामामध्ये काही चुका नाहीत, पण पूर्वेकडील भागामध्ये लँडिंगदरम्यान तांत्रिक अडचणी आल्या असून त्याची पूर्तता लवकरच करण्यात येणार आहे. तसेच स्थानकात मुंबई दिशेकडे आणखी एक नवा पादचारी पूल बांधण्याचे काम प्रगतीपथावर असून त्यासंदर्भातही काही सूचना असतील, तर त्या सांगाव्यात. त्याचा विचार करण्यात येणार असल्याचे सांगितले.


आसनगाव स्थानकातून कल्याण व मुंबईच्या दिशेने जाणाºया लोकलफेºयांच्या वेळा सुधाराव्यात, गर्दीच्यावेळी काही लोकलफेºया द्याव्यात, अशी मागणी संघटनेने केली. त्यावर अभ्यास सुरू असून आगामी काळात गांभीर्याने विचार करण्यात येणार असल्याचे सांगितले. लोकलची वेळ बदलण्यासंदर्भात प्रशासन सकारात्मक असून लवकरच बदल करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. याच मार्गावरील टिटवाळा, खडवली, आंबिवली, कसारा, खर्डी स्थानकांमधील प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भातही चर्चा झाली. स्थानकांमधील पाणपोया, स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही कॅमेºयांची गरज आदी बाबींवर चर्चा झाली. प्रवाशांनीही सतर्क राहावे, स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे व त्यासाठी प्रवासी संघटनेने पुढाकार घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले. या चर्चेअंती शुक्रवारी करण्यात येणारे आंदोलन मागे घेण्यात आले.

उंबरमाळी, तानशेत थांब्यांना स्थानकाचा दर्जा देण्यात आल्यानंतरही त्या स्थानकांमध्ये सोयीसुविधा मात्र देण्यात आलेल्या नाहीत. त्यातच एका रेल्वे तिकीट तपासनिसाचा लोकलमधून पडून अपघाती मृत्यू झाला, ही गंभीर बाब असल्याचे प्रवासी संघटनेने निदर्शनास आणले. त्या ठिकाणची बहुतांश कामे मे २०१९ पर्यंत पूर्ण केली जातील, असा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केल्याचे विशे यांनी सांगितले. रेल्वे प्रशासनाने ही कामे पूर्ण करावीत अन्यथा आम्हाला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असे संघटनेच्या पदाधिकाºयांनी सांगितले. वरील दोन्ही स्थानकांवर तातडीने सुविधा द्याव्यात अशी मागणीही केली आहे.

Web Title: There are no local trains on the Kalyan-Kasara route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.