आदिवासी मुलींच्या वसतिगृहात ६७ विद्यार्थिनींसाठी केवळ चार खोल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:20 AM2019-03-29T00:20:51+5:302019-03-29T00:21:10+5:30

कोपरी येथील आदिवासी मुलींचे वसतिगृह जीवघेण्या समस्यांचे आगार ठरले आहे. मुंबईच्या वेस्टर्न लाइनचे हे वसतिगृह ठाण्यातील महापालिकेच्या १६ नंबर शाळेच्या तळ मजल्यावर तग धरून आहे.

 There are only four rooms for 67 students in tribal girls' hostels. | आदिवासी मुलींच्या वसतिगृहात ६७ विद्यार्थिनींसाठी केवळ चार खोल्या!

आदिवासी मुलींच्या वसतिगृहात ६७ विद्यार्थिनींसाठी केवळ चार खोल्या!

Next

- सुरेश लोखंडे

ठाणे : कोपरी येथील आदिवासी मुलींचे वसतिगृह जीवघेण्या समस्यांचे आगार ठरले आहे. मुंबईच्या वेस्टर्न लाइनचे हे वसतिगृह ठाण्यातील महापालिकेच्या १६ नंबर शाळेच्या तळ मजल्यावर तग धरून आहे. तब्बल ६७ विद्यार्थिनी केवळ चार खोल्यांमध्ये वास्तव्यास असून, येथील सुरक्षा रामभरोसे असल्याचे वास्तव निदर्शनास आले आहे. यात वेळीच सुधारणा न झाल्यास विद्यार्थी अपर आयुक्तास घेराव घालून तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.
आदिवासी विकासचे विभागीय पातळीवरील अपर आयुक्त कार्यालय वसतिगृहाजवळच वागळे इस्टेटमध्ये आहे. त्याची थोडीही भीती न बाळगणारे वसतिगृह अधीक्षक, सुरक्षारक्षक, शिपाई आदी सर्वच जण भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. अपर आयुक्तालयासह प्रकल्प अधिकारी कार्यालय अधिकाऱ्यांच्या कृपाशीर्वादामुळे ते वसतिगृहास बऱ्याचदा दांडी मारतात. पिण्याच्या पाण्यापासून शौचालयसमस्या आणि धोकादायक इमारतीत येथील विद्यार्थिनी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. पालघर, जव्हार, मोखाडा, शहादा, नंदुरबार, दोंडाईचा आदी आदिवासी भागांतील विविध विद्याशाखांचे अकरावी ते पदवी-पदव्युत्तरचे उच्चशिक्षण या वसतिगृहात राहून विद्यार्थिनी घेत आहेत. या वसतिगृहाचे स्थलांतर लवकरच वेस्टर्न लाइनला होणार आहे. पण, तोपर्यंत या विद्यार्थिनींना वाºयावर सोडण्याच्या विरोधात आदिवासी संघटनादेखील रस्त्यावर उतरण्याच्या प्रयत्नात आहे.
शौचालयाचा स्लॅब पडून येथील विद्यार्थिनी अलीकडेच गंभीर जखमी झाली. तिच्यावर कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याचा थांगपत्ता नसलेल्या प्रशासनाच्या निदर्शनास ही घटना प्रसारमाध्यमांनी आणून दिली. त्यानंतर, या वसतिगृहाच्या अधीक्षक मॅटर्निटी रजेवर असल्याचे समजल्याने प्रशासनाने घाईगर्दीत एपीओ चव्हाण यांच्याकडे पदभार दिला. त्या दुपारनंतर वसतिगृहात उपस्थित राहून रात्री निघून गेल्या. बुधवारी रात्रीदेखील त्या व वॉचमन वसतिगृहात नसल्याचे अपर आयुक्त संजीव मीना यांच्या निदर्शनास लोकमतने आणून दिले. त्यानंतर, रात्री उशिरा प्रभारी अधीक्षक हजर झाल्याचे दिसून आले. घटनेच्या तब्बल तीन दिवसांनी, म्हणजे गुरुवारी निर्ढावलेल्या आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी, रात्र व दिवसाच्या दोन्ही अधीक्षक, शिपाई, सुरक्षारक्षक आदी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वसतिगृहात हजेरी लावून विद्यार्थिनींची विचारपूस करत पाहणी केली.
याआधी म्हणजे २०१६ ला देखील अशीच घटना घडून विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यावेळीही प्रशासनाने लक्ष दिले नसल्याची आठवण यावेळी विद्यार्थिनींनी करून दिली.
६७ विद्यार्थिनींसाठी दोन शौचालये
वसतिगृहासाठी दिवस व रात्रीसाठी दोन वेगवेगळ्या अधीक्षक असतानाही बºयाचदा त्या उपस्थित नसतात, असा पाढा विद्यार्थिनींनी यावेळी प्रकल्प अधिकाºयांसमोर वाचला. टीएमसीच्या इमारतीतील वसतिगृहात या ६७ विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक रात्रंदिवस तैनात नसतो. एवढ्या मोठ्या वसतिगृहात केवळ दोन शौचालये व बाथरूम आहेत. आश्चर्य म्हणजे, तब्बल ६७ विद्यार्थिनींसाठी केवळ चार खोल्या आहेत.
मुलीच करतात शौचालयाची साफसफाई
शिपाई, स्वीपर नसल्यामुळे मुलींनाच वसतिगृहाची साफसफाई करावी लागते. बाथरूम, शौचालय धुवावे लागते. या वसतिगृहाच्या स्वयंपाकीन मावशी व सुरक्षारक्षक अपर आयुक्तांच्या बंगल्यावर तैनात असल्याची चर्चा आहे. या विद्यार्थिनींना डीबीटीमार्फत मिळणाºया साडेतीन हजार रुपयांतून बाहेरून जेवणाचा डबा महिनाभर मिळतो. त्याद्वारे मिळणाºया मोजक्या जेवणामुळे या विद्यार्थिनी अर्धपोटी राहत आहेत.

वसतिगृहात जेवणाची व्यवस्था हवी
याआधी वसतिगृहात जेवण मिळत असे, तसे जेवण वसतिगृहात पुन्हा सुरू करा. त्यासाठी महिन्यापोटी सुमारे दोन हजार १०० रुपये प्रतिविद्यार्थिनीवर शासन खर्च करत होते. पण, सध्या साडेतीन हजार रुपये विद्यार्थिनींच्या बँक खात्यात जमा होत आहेत. त्यातून सुमारे १०० रुपयांप्रमाणे विद्यार्थिनी रोज दोनवेळचा जेवणाचा डबा बाहेरून घेतात. बºयाच विद्यार्थिनी अर्धपोटी राहत असल्याचे वास्तव विद्यार्थिनींनी सांगितले. जेवणात सुधारणा करून शासनाने वसतिगृहातच जेवणाची व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे.

डीबीटीद्वारे शिक्षणाऐवजी व्यसनाधीनता
डीबीटीद्वारे मिळणारे साडेतीन हजार रुपये विद्यार्थिनी पोटाला खात नाहीत. अर्धपोटी राहतात. काही जणी पैसे घेऊन अन्यत्र खर्च करतात. शिक्षण न करता गावी जातात. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडत असून, विद्यार्थ्यांमध्यें व्यसनाधीनताही वाढीला लागत असल्याचे वास्तव दिसून येत आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थी शिकावा, उच्चशिक्षित व्हावा, हा उद्देश सफल होत नसल्याचे वास्तवही विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींकडून सांगितले
जात आहे.

पाण्याचा अभाव : पिण्याच्या पाण्यासह बाथरूम व शौचालयातील नळांना पाण्याचा सतत तुटवडा आहे. वसतिगृहात फिल्टर बसवण्यात आले; पण त्यासाठी पाणीच नाही. या अत्यावश्यक सोयीसुविधांकडे लक्ष न देणाºया प्रशासनास या पाहणी दौºयाप्रसंगी प्रकल्प अधिकाºयांना विद्यार्थिनींनी चांगलेच धारेवर धरले. दिवसा व रात्री महिला अधीक्षक, महिला चौकीदार सुरक्षेच्या दृष्टीने वसतिगृहात उपस्थित ठेवण्याची गरज विद्यार्थिनींनी व्यक्त केली.

पालिकेच्या शाळेच्या सुरक्षारक्षकांचा आधार
सद्य:स्थितीला ठाणे महापालिकेच्या शाळेच्या सुरक्षारक्षकांच्या भरवशावर या विद्यार्थिनींची रात्रंदिवस सुरक्षा होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी राहत असलेल्या या वसतिगृहासाठी दिवसा व रात्रीदेखील सुरक्षारक्षक आदिवासी विकास विभागाकडून तैनात केले जात नसल्याची गंभीर बाब यावेळी उघडकीस आली आहे.

Web Title:  There are only four rooms for 67 students in tribal girls' hostels.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे