मीरा भाईंदर मधील रस्त्यांवर खड्डेच खड्डेच
By धीरज परब | Published: July 2, 2023 07:10 PM2023-07-02T19:10:59+5:302023-07-02T19:11:08+5:30
पावसाच्या दमदार आगमनाने मीरा भाईंदर मधील डांबरी रस्त्यांची पोलखोल सुरु झाली.
मीरारोड - पावसाच्या दमदार आगमनाने मीरा भाईंदर मधील डांबरी रस्त्यांची पोलखोल सुरु झाली असून मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालवणे जिकरीचे बनले आहे .
रस्त्यांच्या कामांचा दर्जा व लेव्हल राखणे तसेच पाण्याचा निचरा करण्याचे प्रभावी उपाय कडे वर्षानु वर्ष कणीवपूर्वक केले जाणारे दुर्लक्ष यंदा देखील पाऊस सुरु होताच रस्त्यांवर खड्डे पडण्यास कारणीभूत ठरले आहे . दहिसर चेकनाका ते भाईंदर पश्चिम पर्यंत मेट्रोचे काम सुरु असल्याने त्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेच पण करोडो रुपये खर्च करून बनवलेला मुख्य असा छत्रपती शिवाजी महाराज मार्ग सुद्धा खड्ड्यांची व्यापला आहे . शहरातील बहुतांश डांबरी रस्त्यांवर खड्डे पडले असून नव्याने खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे .
या शिवाय चेकनाका ते वरसावे पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग आणि वरसावे ते काजूपाडा पर्यंतचा घोडबंदर मार्ग सुद्धा खड्ड्यांनी व्यापला आहे . महामार्गाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची तर घोडबंदर मार्गाची जबाबदारी राज्यच्या सार्वजनिक बांधकाम विभागा कडे आहे . खड्डे पडल्याने हे दोन्ही रस्ते जीवघेणे बनले असून वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे .
पावसाचे पाणी साचून राहिले असल्यास खड्ड्याचा व त्याच्या खोलीचा अंदाज वाहन चालकांना येत नाही . खड्डयां मुळे सर्वात जास्त धोका दुचाकीस्वारांना निर्माण झाला असून या आधी देखील खड्ड्यांनी दुचाकी स्वारांचे बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत .