अजूनही विक्रमगडच्या बॅकांमध्ये गर्दीच
By admin | Published: January 10, 2017 05:33 AM2017-01-10T05:33:27+5:302017-01-10T05:33:27+5:30
नोटाबंदीच्या निर्णयास दिलेला कालावधी पुर्ण झालेला झाले मात्र बॅकासमोर गर्दी आतातरी कमी होईल असे वाटत होते परंतु गर्दी कामी कमी होत नाही.
विक्रमगड: नोटाबंदीच्या निर्णयास दिलेला कालावधी पुर्ण झालेला झाले मात्र बॅकासमोर गर्दी आतातरी कमी होईल असे वाटत होते परंतु गर्दी कामी कमी होत नाही.गर्दीचे प्रमाण वाढतच आहे.
अजूनही सुट्या नोटांची टंचाई कायम आहेच. तर त्यामुळे बाजारपेठेतील असलेली मंदीचे सावट कायम आहे. पंतप्रधानांची ५० दिवसांत नोटांची चणचण संपुष्टांत येईल ही घोषणा हवेतच विरली आहे. बंद असलेले एटीएम व बँकांसमोरील रांगा आजही कायम आहेत.
आज ५० दिवस पूर्ण होऊन देखील रांगेत उभे राहाण्याची अरलेली वेळ संपुष्टांत आलेली नाही. रांगेत तासनतास उभे राहाणा-यां खातेदारांना अचानक पैसे संपले असे आजही सांगितले जात आहे.
एटीएम,बॅकांमध्ये दोन हजारांच्या नोटाच प्रामुख्याने मिळत असल्याने सुटटयांसाठी मोठी खटपट करावी लागत आहे.कॅशलेस वा चेक स्वरुपातून जास्त रक्कमेची खरेदी होत असली तरीही खेडयापाडयातील लोकांना छोटयामोठया वस्तूसाठी रोख रक्कमेचाच व्यवहार करावा लागतो व त्यावर बंधने कायम असल्याने मोठी अडचण निर्माण होत आहेत. ती दूर होणार कधी? याचे उत्तर कुणाकडेच नाही. (वार्ताहर)
काही ठिकाणच्या सुरु असलेल्या एटीएम मधून केवळ दोन हजारांची एकच नोट एकावेळी उपलब्ध होते.अजूनही बॅकेत जाउन दिवसभर रांगेत ताटकळत उभे राहून पैसे काढावे लागत आहेत.
-धु्रपद पटेल विक्रमगड
ग्रामीण भागातील जनतेला कॅशलेस व्यवहार करणे आजही जमत नसल्याने खरेदी-विक्रीचे अनेक व्यवहार उधारीने होत आहेत.तर ब-यांच व्यवहारांत सुटया पैशांचा अभाव असल्याने ते ठप्प झाले आहेत.
-रविंंद्र आयरे विक्रमगड
किराण माल, मेडिकल, रुग्णालये, सिनेमागृहे यांच्यासह इलेट्रॉनिक्स वस्तू, दुचाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदी-विक्रीचा बाजार ब-याच अंशी थंडावला आहे.
-संदेश राउत विक्रमगड