ठाणे जिल्ह्यातील ग्रामस्थांना शुद्ध, शाश्वत पाणी उपलब्ध करून देण्याची गरज

By सुरेश लोखंडे | Published: January 30, 2024 06:24 PM2024-01-30T18:24:42+5:302024-01-30T18:24:55+5:30

जिल्हा परिषद अंतर्गत पाणी गुणवत्ता व सनियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

there is a need to provide clean sustainable water to the villagers of thane district | ठाणे जिल्ह्यातील ग्रामस्थांना शुद्ध, शाश्वत पाणी उपलब्ध करून देण्याची गरज

ठाणे जिल्ह्यातील ग्रामस्थांना शुद्ध, शाश्वत पाणी उपलब्ध करून देण्याची गरज

सुरेश लोखंडे, ठाणे : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमा अंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेकडून आज जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असता त्यात होते. स ग्रामीण भागातील लोकांना शश्वात व स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी व्यक्त केली. 

जिल्हा परिषद अंतर्गत पाणी गुणवत्ता व सनियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी यांनी भूषवले. या कार्यशाळेसाठी व जिल्हा स्तरावरील खाते प्रमुख व तालुकास्तरावरील सर्व गटविकास अधिकारी, उपअभियंता, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, आरोग्य कनिष्ठ अभियंता, गटसमन्वयक, समूह समन्वयक, पाणी गुणवत्ता निरीक्षक आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सध्या स्थितीत ठाणे जिल्ह्यातील पाणी गुणवत्ता व सर्वेक्षण व विविध प्रकारच्या पाणी नमुने तपासणी सद्यस्थिती या विभागाचे अधिकारी अनिल निचिते यांनी दिली. अध्यक्षीय भाषणात कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील सर्व गांवकऱ्यांना स्वच्छ व मुबलक पाणी जलद गतीने उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा जिल्ह्यात सक्रीय असल्याचे नमुद केले. कार्यशाळेच्या प्रमुख तांत्रिक मार्गदर्शक गायत्री चावरे यांनी विविध प्रकारच्या पाणी नमुने तपासणीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने पाणी गुणवत्ता सनियंत्रण, सर्वेक्षण, पाणी गुणवत्ता व्यवस्थापन आदींची सखोल माहिती देऊन पावसाचे पाणी कसे दुषित होते. पाणी प्रदूषणाचे प्रकार, ग्रामपंचायत भूमिका, जबाबदारी, लोकांचा सहवास, पाणी गुणवत्ता तपासून पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण, पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्याची कार्यपद्धती, क्लोरीन पावडर विषयी माहिती, ओ टी चाचणी कशी करण्यात यावी आदीचे सखाेल मार्गदर्शन या कार्यशाळेत देण्यात आले.

Web Title: there is a need to provide clean sustainable water to the villagers of thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी