शनिवार अन् सोमवारी दिवाळीचा कोणताही सण नाही; दा.कृ.सोमण यांची माहिती

By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 6, 2023 07:49 PM2023-11-06T19:49:19+5:302023-11-06T19:49:28+5:30

पुढीलवर्षी दिवाळी येणार १२ दिवस अगोदर

There is no festival on Saturday and Monday Diwali; Dr. Kr. Soman's information | शनिवार अन् सोमवारी दिवाळीचा कोणताही सण नाही; दा.कृ.सोमण यांची माहिती

शनिवार अन् सोमवारी दिवाळीचा कोणताही सण नाही; दा.कृ.सोमण यांची माहिती

ठाणे : ९ नोव्हेंबरपासून दिवाळीचे मुहुर्त सुरू होत आहे. यात मात्र शनिवार ११ नोव्हेंबर आणि सोमवार १३ नोव्हेंबर रोजी कोणतेही सण नाहीत अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिली. पुढीलवर्षी दीपावलीचा सण १२ दिवस अगोदर येणार आहे. २०२४ साली शनिवार २ नोव्हेंबर  रोजी बलिप्रतिपदा येणार असल्याचे सोमण यानी सांगितले.

सोमण यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, यावर्षी गुरुवार ९ नोव्हेंबर रोजी रमा एकादशी, गोवत्स द्वादशी, वसुबारस आहे. यादिवशी गाय आणि वासरू यांचे पूजन करावयाचे असते. शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, धन्वंतरी जयंती आहे. या दिवशी दीपदान करावयाचे आहे. गरजू, गरीबांना दीपावली सण साजरा करता यावा यासाठी दीप, वस्त्र आणि फराळही दान करायचा आहे. या दिवशी व्यापारी नवीन वर्षाचे हिशोब लिहिण्याच्या चोपड्या खरेदी करतात. या दिवशी सकाळी ६-४४ ते ८-०९ चल, सकाळी ८-१० ते ९-३४ लाभ, सकाळी ९-३५ ते १०-५९ अमृत, दुपारी १२-२४ ते १-४९ शुभ आणि सायं. ४-३९ ते ६-०१ चल चौघडी यावेळेत चोपड्या आणाव्यात. शनिवार ११ नोव्हेंबर रोजी कोणताही सण नाही.

रविवार १२ नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी कुबेर पूजन आहे. या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करावयाचे आहे. तसेच याच दिवशी प्रदोषकाळी म्हणजे सायं. ६ ते रात्री ८-३३ यावेळेत लक्ष्मी-कुबेर पूजन करावयाचे आहे. सोमवार १३ नोव्हेंबर या दिवशी दिवाळीतील कोणताही सण नाही. मंगळवार १४ नोव्हेंबर या दिवशी बलिप्रतिपदा आहे. विक्रम संवत् २०८० राक्षसनाम संवत्सराचा तसेच महावीर जैन संवत् २५५० चा प्रारंभ होत आहे. हा दिवस साडेतीन मुहूर्तातील शुभ दिवस आहे. या दिवशी गोवर्धन पूजन आणि अन्नकूट आहे. याच दिवशी व्यापारी लोक नवीन चोपड्यांवर लेखनास प्रारंभ करतात. त्यासाठी सकाळी ९-३४ ते १०-५८ चल, १०-५९ ते १२-२२ लाभ, दुपारी १२-२३ ते १-४६ अमृत आणि दुपारी ३-१० ते ४-३४ शुभ चौघडीत वही लेखन करावे. बुधवार १५ नोव्हेंबर रोजी यमद्वितीया, भाऊबीज आहे.

Web Title: There is no festival on Saturday and Monday Diwali; Dr. Kr. Soman's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.