Thane: संक्रातील काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करायला हरकत नाही - दा.कृ. सोमण
By अजित मांडके | Published: January 12, 2024 04:00 PM2024-01-12T16:00:51+5:302024-01-12T16:01:12+5:30
Makar Sankranti : येत्या सोमवारी म्हणजेच १५ जानेवारी रोजी मकर संक्रात आहे. यादिवशी काळे वस्त्र परिधान करायचे नाही? याबाबत अनेकांच्या मनात शंका असतात. परंतु यादिवशी काळे वस्त्र परिधान करण्यास हरकत नसल्याचे मत पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले.
- अजित मांडके
ठाणे - येत्या सोमवारी म्हणजेच १५ जानेवारी रोजी मकर संक्रात आहे. यादिवशी काळे वस्त्र परिधान करायचे नाही? याबाबत अनेकांच्या मनात शंका असतात. परंतु यादिवशी काळे वस्त्र परिधान करण्यास हरकत नसल्याचे मत पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले.
यावर्षी रविवार १४ जानेवारी रोजी उत्तररात्री २ वाजून ४२ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचा सण सोमवार १५ जानेवारी रोजी साजरा करावयाचा आहे. मकर संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले आहे म्हणून त्या दिवशी काळे वस्त्र परिधान करू नका. काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर अशुभ आहे अशी अफवा काही लोक पसरवीत आहेत त्यात काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणीही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायला काहीही हरकत नाही. उलट थंडीत काळ्या रंगाची वस्त्रे ही शरीर उबदार ठेवतात. म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्राचीन प्रथा असल्याचेही त्यांनी सांगितले.