नौपाडा अन् कोपरीत आज नाही पाणी; नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 06:51 PM2022-04-22T18:51:52+5:302022-04-22T18:52:00+5:30
काम अत्यंत तातडीचे असल्याने शुक्रवारी सकाळी ९ ते शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत, असा २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
ठाणे : शहरातील नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अंतर्गत कोपरी क्षेत्रातील असलेले कन्हैयानगर जलकुंभ येथील आउटलेट जलवाहिनीचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने नव्याने बसविणे आवश्यक आहे. काम अत्यंत तातडीचे असल्याने शुक्रवारी सकाळी ९ ते शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत, असा २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या शटडाउनमुळे कन्हैयानगर जलकुंभांतर्गत कोळीवाडा, सुदर्शन कॉलनी, साईनगर, नातू कॉलनी, सावरकर नगर, वाल्मीकी पाडा सोसायटी, कुंभारवाडा, गुरूदेव सोसायटी, कृष्णानगर, स्वामी समर्थ मठ परिसर आदी परिसराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या शटडाउनमुळे पाणीपुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.