ठाणे शहरातील काही भागात मंगळवारी पाणी नाही
By अजित मांडके | Published: January 8, 2024 01:29 PM2024-01-08T13:29:09+5:302024-01-08T13:29:41+5:30
मंगळवारी सकाळी ११ ते बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्यामुळे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा २४ तास बंद ठेवण्यात आला आहे.
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आनंदनगर येथील चिल्ड्र ट्रॉफिक पार्क ते न्यू होरायझन स्कूल पर्यत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे कामांतर्गत ४५० मिमी व ३०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्या बाधित होत असल्याने त्या स्थलांतरीत करण्याचे काम आवश्यक आहे. सदर जलवाहिन्या स्थलांतरीत करण्याचे काम उद्या मंगळवारी सकाळी ११ ते बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्यामुळे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा २४ तास बंद ठेवण्यात आला आहे.
या शटडाऊन कालावधीत घोडबंदर रोड आनंदनगर येथील कासारवडवली गाव (काही भाग), एव्हरेस्ट वर्ल्ड संकुल, यशराज पार्क संकुल, होरायझ्न हाईट संकुल, क्रिष्णा ग्रीन लँड पार्क संकुल, विजयपार्क संकुल, राम मंदिर रोड परिसरातील गृहसंकुले, भवानीनगर व ट्रॉफिक पार्क जलकुंभारवरील उन्नती वुड संकुल, ट्रॉपीकल लगुन संकुल विजय विलास संकुल व वाघबीळ जुना गाव व स्वस्तिक रेसीडेन्सी संकुल व हिल स्प्रिंग संकुल सर्व्हिस रोड ते कासारवडवली नाका सर्व्हिस रोड लगतचा परिसर इ. भागांचा पाणीपुरवठा २४ तासासाठी पुर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.
या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे नागरिकांना आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.