बुधवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही
By अजित मांडके | Published: March 13, 2023 01:21 PM2023-03-13T13:21:51+5:302023-03-13T13:25:13+5:30
नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेमधील 2000 मि.मी व्यासाची मुख्य जलवाहिनी लोढा धाम येथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग एन-एच ३ च्या बाजूस बुधवारी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी सकाळी ९ ते गुरूवारी सकाळी ९ वाजेपर्यत २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील माजीवडा, घोडबंदर रोड, पातलीपाडा, गांधीनगर, सिद्धांचल, ऋतुपार्क, जेलटाकी, सिध्देश्वर, समतानगर, इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, रामनगर, इटर्निटी, जॉन्सन, साकेत, रुस्तमजी इ. तसेच कळव्याच्या व मुंब्र्याच्या काही भागात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबान पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.