गुरूवारी ठाण्यात पाणी नाही, पाण्याचा योग्य साठा करण्याचं पालिकेचं आवाहन
By अजित मांडके | Published: April 22, 2024 03:43 PM2024-04-22T15:43:08+5:302024-04-22T15:43:49+5:30
पाणी पुरवठा विभागामार्फत गुरूवारी सकाळी ९ ते शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यत २४ तासाचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती जेल जलकुंभावरुन होणाऱ्या पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिनीचे स्थलांतर करुन मुख्य वितरण वाहिनीला जोडकाम के व्हिला नाला पुलाचे कामासाठी बाधित होत आहे. हे काम करणेसाठी पाणी पुरवठा विभागामार्फत गुरूवारी सकाळी ९ ते शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यत २४ तासाचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कालावधीत उथळसर प्रभाग समिती जेल जलकुंभावरुन होणारा पाणीपुरवठा २४ तास पूर्णपणे बंद राहणार आहे.
या दिवशी उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील राबोडी क्र. १ व २, के व्हिला, आकाशगंगा, पंचगंगा, उथळसर, सेंट्रल जेल परिसर, पोलीस लाईन परिसर व नौपाडा प्रभाग क्षेत्रातील एन.के.टी. कॉलेज परिसर, खारकर आळी, पोलीस हायस्कूलच्या काही भागात पाणीपुरवठा २४ तास पूर्णपणे बंद राहील. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.