जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शुक्रवारी ठाण्यात पाणी पुरवठा नाही

By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 24, 2023 04:20 PM2023-05-24T16:20:41+5:302023-05-24T16:20:50+5:30

स्टेमची जलवाहिनी आणि मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शट डाऊन

There is no water supply in Thane on Friday for the repair of water channel | जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शुक्रवारी ठाण्यात पाणी पुरवठा नाही

जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शुक्रवारी ठाण्यात पाणी पुरवठा नाही

googlenewsNext

ठाणे : स्टेम प्राधिकरणाच्या जल वाहिनीची देखभाल दुरुस्ती आणि ठाणे महापालिकेच्या जल वाहिनीची साकेत पुलावरील दुरुस्ती या कामांमुळे शुक्रवार दि. २६ मे रोजी सकाळी ९.०० ते शनिवार दि. २७ मे रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत असा २४ तासांकरता ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

स्टेम प्राधिकरणाच्या जल वाहिनीची देखभाल, दुरुस्ती यांची कामे या अवधीत केली जाणार आहेत. तसेच, ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जल वाहिनीची साकेत पूल येथे दुरुस्ती तसेच व्हॉल्व बदलेले जाणार आहेत. या कामांसाठी हा २४ तासांचा शट डाऊन घेण्यात येणार आहे. या काळात घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतू पार्क, कारागृह परिसर, गांधी नगर, रुस्तमजी, इंदिरा नगर, रुपादेवी, श्रीनगर, समता नगर, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळवा या भागातील पाणी पुरवठा शुक्रवार २६ मे रोजी सकाळी ९.०० ते शनिवार २७ मे रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत बंद राहील. तसेच, पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

गुरूवारी कोपरीत पाणी नाही
कोपरी येथील ठाणे महापालिकेच्या धोबीघाट जलकुंभाची ५०० मीमी व्यासाची मुख्य जलवितरण वाहिनी विकास कामात वाधित असल्याने स्थलांतरीत करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी क्रॉस कनेक्शन घेण्यात येणार असल्याने गुरूवार, २५ मे सकाळी ९.०० पासून ते शुक्रवार २६ मे रोजी सकाळी ९.०० पर्यंत २४ तासांसाठी कोपरी परिसरातील धोबीघाट व कन्हैयानगर जलकुंभावरुन होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच, पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.या काळात नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करून ठेवावा आणि महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: There is no water supply in Thane on Friday for the repair of water channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.