कामगारांच्या थकीत वेतनासाठी पोलिसात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:21 AM2018-10-16T00:21:47+5:302018-10-16T00:21:50+5:30

कंत्राटदार-युनियनचा वाद : आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

There is a lot of force in the police for the wages of the workers | कामगारांच्या थकीत वेतनासाठी पोलिसात धाव

कामगारांच्या थकीत वेतनासाठी पोलिसात धाव

Next

कल्याण : केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने नेमलेला कंत्राटदार आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना या युनियनमध्ये कामगारांच्या वेतनावरून निर्माण झालेला वाद आता पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन थकवल्याप्रकरणी युनियनने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात कंत्राटदार आणि महापालिका अधिकारी यांच्याविरोधात तक्रार देत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. त्यात आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला असला तरी हे आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्टीकरण कंत्राटदाराने दिले आहे.


केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी वाहनचालक आणि सफाई कामगार पुरवण्याचे कंत्राट विशाल एक्स्पर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतले आहे. त्यांचे १२० घंटागाडीचालक आणि २८० सफाई कामगार कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. परंतु, तीन महिन्यांपासून त्यांना मासिक वेतन मिळालेले नाही. त्यातच, कंत्राटदार कंपनी आणि महापालिका यांच्यात झालेल्या करारानुसार वेतन दिले जात नसल्याचे युनियनचे म्हणणे आहे. लेव्ही रक्कम नमूद नाही, सार्वजनिक सुटीचे पैसे नमूद नाहीत, भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात केली आहे, पण त्याचा क्रमांक कामगारांना दिलेला नाही, राज्य कर्मचारी विमा योजनेचे पैसे कापले जातात, पण त्याचे कुठलेही पत्र किंवा पुरावा कामगारांच्या नावे नसल्याकडे युनियनने लक्ष वेधले आहे.
महापालिकेचे बिल मिळाले नसले तरी कामगारांना कंत्राटदाराने वेतन देणे बंधनकारक आहे. मात्र, तीन महिने त्यांना वेतन मिळालेले नाही. वेतनाची मागणी केल्यावर कामगारांना कामावरून काढण्याची धमकी दिली जाते, असाही आरोप युनियनने केला आहे.


त्याचबरोबर कंत्राटदार युनियनचे कुठलेच पत्र स्वीकारत नाही, तर महापालिका अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे युनियनच्या पदाधिकाºयांचे म्हणणे आहे.


युनियनने थकीत वेतनासाठी ३० सप्टेंबरला ठिय्या आंदोलन केले होते. याउपरही वेतन दिले जात नसल्याने पोलिसात धाव घ्यावी लागली, अशी माहिती युनियनचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर यांनी दिली.


कंत्राटदार हा महापालिका अधिकाºयांच्या संगनमताने कामगारांची आर्थिक फसवणूक करत आहे. त्याबाबत संबंधितांवर फौजदारी कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी युनियनची मागणी असल्याचे उज्जैनकर म्हणाले.

Web Title: There is a lot of force in the police for the wages of the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.