पाणीकपातीसाठी पालिकेकडे पर्यायी व्यवस्था नाही
By admin | Published: February 4, 2016 02:31 AM2016-02-04T02:31:12+5:302016-02-04T02:31:12+5:30
शहराला स्टेमच्या पाणीकपातीतून वगळल्यामुळे पाण्याची पातळी खालावल्याची बोंब उठल्यानंतर लघुपाटबंधारे विभागाने शहरालाही पुनश्च कपात लागू केली आहे
राजू काळे, भार्इंदर
शहराला स्टेमच्या पाणीकपातीतून वगळल्यामुळे पाण्याची पातळी खालावल्याची बोंब उठल्यानंतर लघुपाटबंधारे विभागाने शहरालाही पुनश्च कपात लागू केली आहे. या कपातीदरम्यान पालिकेकडे पाणीपुरवठ्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. मात्र, ज्यांना टँकरचे पाणी मंजूर झाले आहे, त्यांच्याखेरीज इतरांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.
शहराला स्वत:चा पाण्याचा स्रोत नसल्याने केवळ शासकीय कोट्यावर अवलंबून राहावे लागते. स्टेम व एमआयडीसीकडून एकूण १३६ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दररोज होत असला तरी तो लोकसंख्येला अपुरा आहे. पाणीपुरवठ्याच्या ठिकाणाहून शहर सुमारे ४५ किमी अंतरावर शेवटच्या टोकाला असल्याने दोन पाणीपुरवठ्यातील अंतर ५० ते ७० तासांवर जात आहे. यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या ठिकाणच्या रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. स्टेमच्या शिथिल कपातीसह एमआयडीसीची बुधवार व गुरुवारऐवजी प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी, रविवारी कपात लागू झाली.उल्हासनगर शहराचा पाणीपुरवठा सलग दोन दिवस बंद राहणार असून पालिकेने पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था केली नसल्याने हाहाकार उडण्याची शक्यता शहरात निर्माण झाली आहे. हातपंप व विंधन विहिरी दुरुस्त करण्याचे काम कागदावर असून सेना नगरसेवक रमेश चव्हाण, सुभाष मनसुलकर, राजश्री चौधरी आदी नगरसेवकांनी स्वत: पदरमोड करून प्रभागातील नागरिकांसाठी बोअरवेल खोदल्या आहेत.
उल्हासनगर महापालिका पाण्यासाठी संपूर्णत: एमआयडीसीवर अवलंबून आहे. शहराला दररोज ११५ ते १२० एमएलडी पाणीपुरवठा होत असून पूर्वेला पाले व जांभूळ गावच्या जलकुंभांतून ३८ तर पश्चिम भागाला शहाड जलकुंभातून ७८ एमएलडी पाणीपुरवठा होतो. पाटबंधारे विभागाने ३० टक्के पाणीकपात करताच तीव्र पाणीटंचाई शहरात निर्माण झाली असून वेळीच पर्यायी व्यवस्था पालिकेने केली नाही.
यापूर्वी पूर्व भागात गुरुवारी व शुक्रवारी असे सलग दोन दिवस तर पश्चिमेला मंगळवार व शुक्रवारी पाणीपुरवठा बंद केला जात होता. आता शनिवारी, रविवारी सलग दोन दिवस पाणी बंद राहणार असल्याचे प्रसिद्धिपत्रक पालिकेने काढल्याची माहिती कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांनी दिली.च्शहरातील कंवाराम चौक, ओटी सेक्शन, सुभाष टेकडी परिसर, नागसेननगर, दहाचाळ, महात्मा फुले कॉलनी, संतोषनगर, भीमनगर, मद्रासीपाडा, तानाजीनगर, भय्यासाहेब आंबेडकरनगर, रमाबाई आंबेडकरनगर, प्रेमनगर टेकडी परिसर, संभाजी चौक आदी परिसरांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
च्या विभागातून शेकडो नागरिक दररोज पालिकेवर धडकून पाणीपुरवठ्याची मागणी करीत आहेत.
च् सोमवार, मंगळवारी नागरिकांनी पालिकेवर मोर्चा आणला होता. पाणीपुरवठा अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांनी मोर्चा व आंदोलनाचा धसका घेतल्याने मोबाइल बंद करून ठेवले आहेत.नियोजन सोमवारच्या पाणीपुरवठ्याचे
च्सलग दोन दिवस पाणी नसल्याने नागरिकांना तिसऱ्या दिवशी पाणी देणे बंधनकारक असल्याने सोमवारच्या पाणीपुरवठ्यावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. एकाच दिवशी संपूर्ण शहराला मुबलक पाणी देणे गरजेचे असल्याने सोमवारचा पाणीपुरवठा कसा करायचा आणि त्यासाठी काय करता येईल, याचे नियोजन आखण्यात येत आहे.
च्दोन दिवस पाणी नसल्याने साहजिकच नागरिक सोमवारी पाण्याची वाट पाहणार आहे. नागरिकांचा रोष कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यातही वाढीव १० टक्के पाणीकपातीचा भारही उर्वरित पाच दिवसांमध्ये वर्ग केल्याने नियमित पाण्यापेक्षा कमी पाणी शहरात येईल.
च्टँकरचालकांनाही जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा करणार नाही. त्यामुळे टँकरचालकांचेही हाल होणार आहेत. टँकरवर अवलंबून दुर्गम भागांसाठीच पाणी दिले जाणार आहे. मात्र, जेथे नळाद्वारे पाणी येते, तेथे टँकरने पाणी न देण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेमकडून होणारा पाणीपुरवठा यापुढे दर शनिवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्र वार, दिनांक ५ फेब्रुवारीला रात्री १२ ते शनिवारी रात्री १२ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असून या कालावधीत इंदिरानगर, गांधीनगर, श्रीनगर, समतानगर, टेकडी बंगला, घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
शुक्र वार, दिनांक ५ फेब्रुवारीला रात्री १२ ते रविवारी रात्री १२ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत जेल, ऋ तुपार्क, सिद्धेश्वर, उथळसर, साकेत, महागिरी, नौपाडा, पाचपाखाडी व कळव्याचा काही भाग या परिसराचा पाणीपुरवठा ४८ तास बंद राहणार आहे.
एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार ते रविवार या कालावधीत बंद राहणार आहे. त्यानुसार कळवा, मुंब्रा भागांचा पाणीपुरवठा यापुढे शुक्रवार ते रविवारपर्यंत ४८ तास बंद राहणार आहे. या कालावधीत कळवा, विटावा, मुंब्रा, दिवा, शीळ, कौसा, डायघर, देसाई, इंदिरानगर मधील रूपादेवीपाडा व वागळे फायर ब्रिगेड या परिसराचा पाणीपुरवठा ४८ तास बंद राहणार आहे.लाखांच्यावर बदलापूर शहराची लोकसंख्या असून या शहरासाठी दररोज ४७ दशलक्ष लीटर पाण्याची गरज भासते. तर, अंबरनाथ शहराची लोकसंख्या २.७५ लाख असून या शहरासाठी ५५ दशलक्ष लीटर एवढ्या पाण्याची गरज आहे. या दोन्ही शहरांना जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा करत आहे. उल्हास नदीपात्रातून उचलण्यात येणाऱ्या पाण्यावर ४० टक्के कपात लागू केल्याने पाण्याचे वितरण करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत.