डोंबिवलीच्या काही भागांत आज वीज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:42 AM2021-05-11T04:42:40+5:302021-05-11T04:42:40+5:30
डोंबिवली : अत्यंत महत्त्वाच्या व तातडीच्या देखभाल-दुरुस्तीसह पावसाळा पूर्व कामांसाठी डोंबिवलीतील काही भागांचा वीजपुरवठा मंगळवारी काही तासांसाठी बंद ठेवण्यात ...
डोंबिवली : अत्यंत महत्त्वाच्या व तातडीच्या देखभाल-दुरुस्तीसह पावसाळा पूर्व कामांसाठी डोंबिवलीतील काही भागांचा वीजपुरवठा मंगळवारी काही तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
जोशी हायस्कूल जवळचे तीन रोहित्र व त्यावरील उच्च व लघुदाबवाहिन्या स्थलांतरित करावयाच्या आहेत. याशिवाय पावसाळ्यातील संभाव्य बिघाड टाळण्यासाठी वृक्षाच्या फांद्या छाटणे, वेली दूर करणे, नटबोल्ट बदलणे, जीओडी मेंटेनन्स आदी देखभाल दुरुस्तीसाठी बाजीप्रभू उपकेंद्रांतर्गत कोपर रोड, शास्त्रीनगर, जुनी डोंबिवली भागात सकाळी ११ ते दुपारी २ तर ठाकुर्लीतील पीव्ही रोड, छेडा रोड, पेंडसेनगर, ९० फीट रोड, चोळेगाव, हनुमान मंदिर परिसर, ठाकुर्ली स्टेशन, विवेकानंद सोसायटी, पंचायत बावडी, बालाजीनगर, नेहरूरोड, फडकेरोड, फते अलीरोड, गणेश मंदिर व परिसर, सावरकररोड भागात सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहील.
गरिबाचा पाडा फिडरवरील महाराष्ट्रनगर, सरोवरनगर, सह्याद्रीनगर, मल्हारनगर, श्रीधर म्हात्रे चौक भागाचा सकाळी ९ ते दुपारी १२, तर काळूनगर फिडरवरील ठाकूरवाडी, काळूनगर, आनंदनगर व सम्राटनगरच्या काही भागांचा वीजपुरवठा दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच दरम्यान बंद राहणार असल्याचे महावितरणने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. यासंदर्भात वीजग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइलवर संदेश पाठवले असून, सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
------/---