पाणीकपातीतून सुटका नाहीच

By admin | Published: January 14, 2017 06:31 AM2017-01-14T06:31:56+5:302017-01-14T06:31:56+5:30

पाऊस चांगला होऊनही जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आदींमध्ये सुरू असलेली कपात रद्द करण्यासाठी सुमारे सर्वच

There is no escape from watercourses | पाणीकपातीतून सुटका नाहीच

पाणीकपातीतून सुटका नाहीच

Next

ठाणे : पाऊस चांगला होऊनही जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आदींमध्ये सुरू असलेली कपात रद्द करण्यासाठी सुमारे सर्वच राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन कंबर कसली होती. परंतु, जलसंपदा विभागाने सध्याच्या उपलब्ध पाणीसाठ्यास अनुसरून लागू केलेल्या एक दिवसाच्या पाणीकपातीतून सुटका नसल्याचे स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात सध्या निवडणुकीचे वातावरण तयार झालेले आहेत. या कालावधीत मतदारांची नाराजी ओढून न घेता वाढीव पाणीपुरवठ्याचा गाजावाजा ठिकठिकाणच्या सत्ताधाऱ्यांनी केला आहे. मात्र, तो फोल ठरणार आहे. जलसंपदा विभागाकडे मंत्रालयात नुकतीच बैठक होऊन सर्वांनीच वाढीव पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. त्यानुसार, तयार केलेले उपसमितीचे ठराव मंत्रालयीन पातळीवरील बैठकीत मांडले जाणार आहेत. परंतु, वाढीव पाणीपुरवठ्याची ही मागणी सध्यातरी पूर्ण होणे शक्य नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केल्याचे समजते.
एमआयडीसी, केडीएमसी, मीरा-भार्इंदर, भिवंडी आदी महापालिका आणि अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांनी वाढीव पाणीपुरवठ्याची मागणी केलेली आहे. मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाण्याची ही मागणी आहे. वाढीव लोकसंख्या, त्यासाठी जादा पाणी वापरले जात आहे. परंतु, धरणातील पाणीसाठवण क्षमता लक्षात घेता ही अवास्तव मागणी सध्यातरी पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी बारवी पूर्ण क्षमतेने भरणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: There is no escape from watercourses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.