‘हुमायून’वर बिबट्या फिरकलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 03:37 AM2018-05-02T03:37:40+5:302018-05-02T03:37:40+5:30
बुद्ध पौर्णिमेच्या रात्रीला लख्ख प्रकाशात येऊरच्या हुमायून बंधाऱ्यावर बिबट्या येईल आणि पाणी पिताना दर्शन देर्ईल
महेंद्र सुके
ठाणे : बुद्ध पौर्णिमेच्या रात्रीला लख्ख प्रकाशात येऊरच्या हुमायून बंधाऱ्यावर बिबट्या येईल आणि पाणी पिताना दर्शन देर्ईल, या आशेने सारी रात्र जागरण केले; मात्र बिबट्याच काय, तिथे साधं चिटपाखरूही फिरकलं नाही. त्यामुळे वन्यजीवांचे दर्शन घेण्याची तहान अतृप्तच राहिली.
वनविभागाच्या वतीने ३० एप्रिलच्या रात्री जंगलातील पाणवठे, बंधारे, तलाव, नदी आदी ठिकाणी पाणी पिण्यासाठी येणाºया वन्यजीव प्राणी, पशुपक्षी आदींंची गणना करण्याची मोहीम मुंबई परिसरातील वेगवेगळ्या जंगल परिसरांत राबवण्यात आली. ठाण्यातील येऊरच्या जंगलातही वेगवेगळ्या ठिकाणी वनविभागाचे पथक तैनात होते. त्यातील वायुसेनेच्या हद्दीत असलेल्या हुमायून बंधाºयावर वनाधिकाºयांसह ‘लोकमत’ टीमने रात्रभर जागल करत ‘आॅन द स्पॉट’ पहारा दिला.
हुमायून बंधाºयाचे वनपरिक्षेत्र वायुसेनेच्या अखत्यारित असल्याने सर्वसामान्य माणसांना जाण्यास बंदी आहे. त्यामुळे निर्मनुष्य ठिकाणी वन्यजीव नक्कीच दर्शन देतील, अशी अपेक्षा होती. जंगलातील निमुळती वाट तुडवत वनकर्मचारी निसर्गप्रेमींसोबत सायंकाळी ६ वाजल्यापासूनच पहारा देऊन होते. या रात्रभराच्या मोहिमेत अधूनमधून चंद्राचे ढगाआड जाणे, पुन्हा लख्ख प्रकाश येणे, हा खेळ मात्र आनंद देणारा होता. साºयांच्या नजरा पाणवठ्यावर खिळल्या होत्या. काजवे चमकले तरी ते एखाद्या प्राण्याचे डोळे असावे, या आशेने लगेच सारे त्या दिशेने मोठ्या आशेने बघत होते.
माकडाचा आवाज येणे क्षणभरातच बंद झाले. पुन्हा शांतता. आता उजाडण्यापूर्वी एकदा पाणी पिण्यासाठी नक्की येईल, असा आशावादी विश्वास पेरला गेला. रात्र, मध्यरात्र, पहाट आणि प्रभातही झाली. चंद्र मावळायला लागला. सूर्य उगवला; पण बिबट्याच काय चिटपाखरूही त्या पाणवठ्यावर फिरकले नाही.या पाणवठ्यावर येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी दिलेल्या मध्यरात्रीपर्यंतच्या पहाºयासह नियत क्षेत्र वनाधिकारी राजन खरात, वॉचमन रतन फरले, हौशी वन्यजीवप्रेमी सत्यजित जोशी, आल्हाद ओक, निसर्गप्रेमी पुष्कर बापट, सुबोध हत्तरकी आणि गणेश विसपुते यांनी रात्रभर जागल केली.