वाड्यातील शेकडो एकरावर लावणीच नाही

By admin | Published: August 17, 2016 02:15 AM2016-08-17T02:15:07+5:302016-08-17T02:15:07+5:30

तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जात असले तरी आता निसर्गाचा लहरीपणा, मजुरांची कमतरता, यांत्रिक उपकरणे आणि खतांचे वाढलेले दर या अनेक कारणांमुळे येथील शेतकऱ्यांनी शेकडो एक

There is no plantation on hundreds of acres in the castle | वाड्यातील शेकडो एकरावर लावणीच नाही

वाड्यातील शेकडो एकरावर लावणीच नाही

Next

वसंत भोईर ,  वाडा
तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जात असले तरी आता निसर्गाचा लहरीपणा, मजुरांची कमतरता, यांत्रिक उपकरणे आणि खतांचे वाढलेले दर या अनेक कारणांमुळे येथील शेतकऱ्यांनी शेकडो एकर जमिनी ओस ठेवल्या आहेत. दरम्यान, ओस जमिनी बाबत कृषी विभागाने जाहीर केलेली आकडेवारी ही धादांत खोटी असून त्यांनी आमच्या शेतकऱ्यांसोबत सर्वेक्षण करावे असे खुले आव्हान प्रफुल्ल पाटील या शेतकऱ्याने कृषी विभागाला दिले आहे .
वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. मुंबईच्या बाजारपेठेत या वाणाला चांगली मागणी आहे. तालुक्यात १७६ गावे व २०० हून अधिक पाडे आहेत. १८ हजार ५०० हेक्टर क्षेत्रामध्ये भाताची लागवड केली जाते. येथील झिनी, सुरती, गुजरात ४, गुजरात ११, जया, रत्ना, सुवर्णा, कर्जत, मसुरी आदी भाताच्या वाणांची लागवड करून उत्पादन घेतात. तालुक्यात मोठयÞा प्रमाणात भातशेती केली जाते. या व्यवसायासाठी जास्त संख्येने मजुरांची आवश्यकता भासत असते. परंतु औद्योगिक करणामुळे येथील मजूर कारखान्यात व रेती व्यवसायावर कामाला जात असतात. भात लावणीसाठी यांत्रिक उपकरणे नसल्याने या तालुक्यात मजुरांचा प्रश्न सतावत आहे.
भात शेतीत एकरी येणारा खर्च व त्यावर मिळालेले उत्पन्न यांची गोळा बेरीज केली असता उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक असल्याने वर्षानुवर्ष शेती ताट्यात चालली आहे. त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष करून कारखान्यात नोकरी पत्करून आपला आहे. पूर्वी म्हणजेच २५ ते ३० वर्षापूर्वी या भागातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट होती.
मात्र घरातील काही माणसे कारखान्यात कामाला जात असल्याने त्यांची आथिर्क परिस्थिती काही प्रमाणात सुधारल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत दरवर्षी तोट्यात चाललेला शेती व्यवसायाला कंटाळून आपली शेती ओस ठेवताना दिसून येत आहे. कृषी खात्याचे याकडे दुर्लक्ष आहे.

मजुरी व्यतिरिक्त
तीन वेळचे जेवण
काही जिल्ह्यात कृषी विद्यापीठाने तयार केलेली भातलावणी यंत्रे महागडी असल्याने ती शेतकऱ्यांना परवडू शकत नाही. भात लावणीसाठी सक्षम शेतकरी तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा व नाशिक येथून मजूर आणतात. या मजुरांना प्रतिदिन ३०० ते ३५० रूपये अधिक तीनवेळा जेवणाचा खर्च करावा लागतो. हा खर्च न परवडणारा आहे.

Web Title: There is no plantation on hundreds of acres in the castle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.