३१ खुनांसह सोनसाखळी चोरीच्या १३० गुन्ह्यांची उकलच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:04 PM2019-11-19T23:04:55+5:302019-11-19T23:06:29+5:30

ठाणे-पालघरमधील गुन्ह्यांची आढावा बैठक; कोकणच्या विशेष पोेलीस महानिरीक्षकांनी घेतली शाळा

There is no solution to the 8 counts of theft of gold chains with 5 murders | ३१ खुनांसह सोनसाखळी चोरीच्या १३० गुन्ह्यांची उकलच नाही

३१ खुनांसह सोनसाखळी चोरीच्या १३० गुन्ह्यांची उकलच नाही

googlenewsNext

- जितेंद्र कालेकर

ठाणे : महिलांच्या गळ्यातील सोनसाखळीच्या होणाऱ्या जबरी चोºया तसेच गेल्या तीन वर्षांमध्ये उघडकीस न आलेले खुनाचे गुन्हे सर्व प्रकारचे कौशल्य पणाला लावून उघडकीस आणण्याचे आदेश कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी ठाणे आणि पालघर जिल्यातील पोलिसांना सोमावरी दिले आहे. काशीमीरा येथे झालेल्या गुन्हे आढावा बैठकीमध्ये त्यांनी हे आदेश दिल्यानंतर या दोन्ही जिल्ह्यांतील तपास अधिकाऱ्यांची चांगलीच झोप उडाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे ग्रामीणच्या काशीमीरा भागातील एका खासगी सभागृहात १८ नोव्हेंबर रोजी कौशिक यांच्या उपस्थितीमध्ये पालघर आणि ठाणे ग्रामीण विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची गुन्हे आढावा बैठक पार पाडली. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या या बैठकीत २०१७, २०१८ आणि २०१९ या तीन वर्षांमधील गुन्ह्यांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पाटील, पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण, वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर तसेच दोन्ही जिल्ह्यांतील वपोनि उपस्थित होते.

तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत
खून आणि जबरी चोरीचे गुन्हे उघड न झाल्यामुळे संबंधित तक्रारदार आणि त्या फिर्यादींना पोलिसांकडून न्याय मिळालेला नाही. त्यामुळे या कुटूंबांना कशाप्रकारे न्याय देता येईल.
हे गुन्हे कशा प्रकारे उघड करता येतील. याबाबत अनेक प्रकारे कौशिक यांनी तपास अधिकाºयांना मार्गदर्शन देखिल केले.
पुन्हा होणाºया आढावा बैठकीमध्ये यातील जास्तीत जास्त गुन्हे उघड करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. याशिवाय, चोºया, वाहन चोºया आणि महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांवरही आळा घालण्याबाबत त्यांनी आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

४० पोलीस ठाण्यांची घेतली शाळा
या बैठकीमध्ये ठाणे ग्रामीणमधील १७ पोलीस ठाण्यांचा तर पालघर जिल्ह्यांतील २३ पोलीस ठाण्यांचा आढावा त्यांनी घेतला. ठाणे ग्रामीणमध्ये गेल्या तीन वर्षांत खुनाच्या १४ गुन्ह्यांची उकल झालेली नाही. (२०१७ मध्ये ४, २०१८ मधील १ आणि २१९ च्या नऊ गुन्ह्यांचा यात समावेश आहे.) तर सोनसाखळी जबरी चोरीचे ६९ गुन्हे दाखल झाले. त्यातील ३० गुन्हे उघडकीस आले असून २९ गुन्ह्यांचा तपास अद्याप प्रलंबित आहे. पालघर जिल्ह्यांत गेल्या तीन वर्षांत खुनाच्या १७ गुन्ह्यांचा छडा लागलेला नाही. (२०१७ मध्ये २, २०१८ मधील ६ आणि २०१९ च्या नऊ गुन्ह्यांचा यात समावेश आहे.) तर सोनसाखळी जबरी चोरीचे १२९ गुन्हे दाखल झाले असून यातील केवळ २८ गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यातील अजूनही १०१ गुन्ह्यांची उकल झालेली नाही.

Web Title: There is no solution to the 8 counts of theft of gold chains with 5 murders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.