पोस्को कायद्यातंर्गत किती दिवसांत FIR नोंदवावा,यासाठी वेळेचे बंधन नाही - मनिषा तुळपुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 07:20 PM2018-10-23T19:20:02+5:302018-10-23T19:20:53+5:30
एखाद्या मुलींवर अत्याचार झाल्यास त्यांचा गुन्हा किती दिवसात नोंदवावा यासाठी पोस्को कायद्याअंतर्गत कोणतेही वेळेच बंधन नाही. दडपणामुळे काही वेळा तक्रार उशिरा दिली जाते. गुन्ह्याच्या घडल्यानंतर काही दिवसांनी जबाब नोंदविला जातो.
कल्याण - एखाद्या मुलींवर अत्याचार झाल्यास त्यांचा गुन्हा किती दिवसात नोंदवावा यासाठी पोस्को कायद्याअंतर्गत कोणतेही वेळेच बंधन नाही. दडपणामुळे काही वेळा तक्रार उशिरा दिली जाते. गुन्ह्याच्या घडल्यानंतर काही दिवसांनी जबाब नोंदविला जातो. त्यासाठी डाक्टरांचे मत महत्त्वाचे आहे. गुन्हा नोंदविण्यास उशीर का झाले याचे योग्य ते कारण द्यावे लागते. याउलट तीन महिन्यांपर्यंत गुन्हा नोंद करावा लागतो, असे मत अॅड. मनिषा तुळपुळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग, परिवर्तन महिला संस्था आणि इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लैंगिक अत्याचार प्रकरणी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, पोलिस अधिकारी, सामाजिक संस्था तसेच वकील यांची भूमिका व जबाबदारी’’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तुळपुळे बोलत होत्या.
समाजातील बालक-बालिका आणि महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे.
त्याप्रमाणात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. गुन्हेगारांना कठोर शासन होत नसल्याने प्रवृत्तीला आळा बसण्याऐवजी या प्रकारच्या गुन्ह्याची संख्या वाढत आहे. पोस्को कायदा व पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित केली आहे. त्यावर या परिसंवादात माहिती देण्यात आली. तुळपुळे म्हणाल्या, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. पण त्याच बरोबर पीडितांचे पुनर्वसन होणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये समुपदेशन ,वैद्यकीय उपचार, स्वत:च्या पायावर उभे करणे आणि शिक्षण या गोष्टी पुनर्वसनात येतात. बाल लैंगिक शोषणाबाबत संवेदनशीलता, खूप वेळ आणि एका चांगल्या टीमची गरज असते. 16 ते 18 हे वय आकर्षणाचे असते. मुलं आणि मुली प्रेमात पडल्यावर आर्थिक परिस्थिती, जात, धर्म या गोष्टी मध्ये येतात.
अशावेळी मुली घरी जात नाही. त्यांना बालसुधारगृहात ठेवा आणि 18 वर्षाची झाल्यावर निर्णय घेऊ द्या. पोक्सो कायद्यातंर्गत काही प्रश्न पडल्यास त्यांवर चर्चा व शाळांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम झाले पाहिजेत. शाळेत मुला-मुलींना जबाबदार लैंगिक वर्तन शिकविले जात नाही. मुलं यापासून वंचित राहतात. एखाद्या व्यक्तींनी चुकीची तक्रार केली व ते सिध्द झाले तर त्या व्यक्तीस शिक्षा होऊ शकते. अशी ओरड महिला आणि मुलांच्या बाबतीत वारंवार होत असते. आरोपी सज्ञान नसल्यास त्याने गुन्हा क्रिमिनल माईण्डने केला आहे का हे पाहिले जाते. चांगले जीवन जगण्याची संधी दिली जाते. समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण त्यांना दिले जाते, असे ही त्यांनी सांगितले.