जलवाहिनी दुरुस्तीला अखेर मुहूर्त, आज डोंबिवली पूर्वेत पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 02:57 AM2018-09-25T02:57:36+5:302018-09-25T02:57:47+5:30

न्यू कल्याण रोडवरील बंदीश पॅलेस चौकातील गळती लागलेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी अखेर केडीएमसीला मुहूर्त मिळाला आहे.

 There is no water in Dombivli in the east | जलवाहिनी दुरुस्तीला अखेर मुहूर्त, आज डोंबिवली पूर्वेत पाणी नाही

जलवाहिनी दुरुस्तीला अखेर मुहूर्त, आज डोंबिवली पूर्वेत पाणी नाही

Next

डोंबिवली - न्यू कल्याण रोडवरील बंदीश पॅलेस चौकातील गळती लागलेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी अखेर केडीएमसीला मुहूर्त मिळाला आहे. पूर्वेकडील भागात पाणीपुरवठा करणाऱ्या या जलवाहिनीचे काम मंगळवारपासून सुरू केले जाणार आहे. या कामासाठी शटडाउन घेतला जाणार असल्याने डोंबिवली पूर्वेकडील भागाचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे बुधवारीही पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, असे केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
डोंबिवली पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाºया ११०० मिलिमीटरच्या या मुख्य जलवाहिनीला महिनाभरापासून गळती लागली आहे. परंतु, प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम न झाल्याने सातत्याने बाहेर पडणाºया पाण्यामुळे येथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. जलवाहिनीची दुरुस्ती करण्याऐवजी खड्डे बुजवण्यासाठी पेव्हरब्लॉकने केलेली डागडुजीही कुचकामी ठरली आहे. खड्ड्यांची खोली पाहता त्यामुळे एखाद्याचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल वाहनचालकांकडून केला जात होता. पाण्याच्या नासाडीबाबत महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांना पत्र दिले होते. जलवाहिनीच्या गळतीमुळे रस्ता खचण्याचे प्रकार सुरू असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. आता मंगळवारपासून जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे पूर्व भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवारीही कमी दाबाने पुरवठा होणार असल्याने पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये ट्रकच्या धडकेने जलवाहिनीचा व्हॉल्व्ह तुटला होता. त्याच्या दुरुस्तीकामी पाणीपुरवठा विभागाला तीन ते चारवेळा शटडाउन घ्यावे लागले होते. त्यानंतरही गळती कायम होती. त्यामुळे मंगळवारच्या शटडाउनमध्ये गळतीची समस्या पूर्णपणे निकाली काढण्यात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना यश येते का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

टिटवाळा, कल्याणमध्येही आज पाणी नाही

१०० दलली क्षमतेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीकामी मंगळवारी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा टिटवाळा, मांडा पूर्व-पश्चिम, उंबर्णी, बल्याणी, मोहिली, जेतवननगर व तिपन्नानगर टेकडी, गाळेगाव, गावठाण, गणेश कॉलनी, पंचशीलनगर, शास्त्रीनगर, फुलेनगर, यादवनगर, मोहनागाव, शहाडगाव, वडवली, अटाळी, आंबिवली तसेच कल्याण पश्चिममधील शहाड, रामबाग, चिकणघर, घोलपनगर, मिलिंदनगर, योगीधाम, मुरबाड रोड, अशोकनगर, वालधुनी, शिवाजीनगर, जोशीबाग व कल्याण रेल्वेस्थानक परिसर या भागांमध्ये होणारा पाणीपुरवठा बंद राहील, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.

Web Title:  There is no water in Dombivli in the east

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.