ठाणे जिल्हा परिषदेत आताही विरोधी पक्ष नाही; चारही सभापती पदे वाटून घेत निवडणूक बिनविरोध 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 08:55 PM2020-07-30T20:55:23+5:302020-07-30T20:55:28+5:30

सेनेने दोन सभापती पदे स्वत:कडे ठेवत राष्ट्रवादीला एक आणि भाजपला एक सभापतीपद देऊन या जिल्हा परिषदेत दिलजमाई केली आहे. 

There is still no opposition in Thane Zilla Parishad; The election was held without any opposition | ठाणे जिल्हा परिषदेत आताही विरोधी पक्ष नाही; चारही सभापती पदे वाटून घेत निवडणूक बिनविरोध 

ठाणे जिल्हा परिषदेत आताही विरोधी पक्ष नाही; चारही सभापती पदे वाटून घेत निवडणूक बिनविरोध 

Next

ठाणे : राज्याच्या राजकारणात विळ्या भोपळ्याचे नाते असलेल्या भाजपाला ठाणे जिल्हा परिषदेत समाजकल्याण समितीचे सभापतीपद देत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेत यावेळी विरोधी पक्ष ठेवलेला नसल्याचे आजच्या विषय समित्यांच्या निवडणुकीवरून उघड झाले. यावेळी सेनेने दोन सभापती पदे स्वत:कडे ठेवत राष्ट्रवादीला एक आणि भाजपला एक सभापतीपद देऊन या जिल्हा परिषदेत दिलजमाई केली आहे. 

सेनेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती रत्नप्रभा तारमळे, बांधकाम, आरोग्य समिती सभापती पदी सेनेचे कुंदन पाटील आणि कृषी सभापती शहापूरचे राष्ट्रवादीचे  संजय निमसे आणि मुरबाडच्या नंदा उघडा यांना समाजकल्याण समिती सभापती पद प्राप्त झाले. त्या भाजपाच्या आहेत. विरोधी पक्षच न राहिल्या मुळे सभापती पदाची ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी पिठासीन अधिकारी म्हणून ठाणे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, यांनी कामकाज पाहिले.  

येथील गोयंका इंटरनॅशनल स्कुल येथे कोव्हिड १९ संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदाच्या निवडणुका गुरुवारी संपन्न झाल्या. विजयी उमेदवारांचे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, अतिरिक्त  मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि.नेमाने यांनी अभिनंदन केले. महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी विराजमान झालेल्या रत्नप्रभा तारमळे ( शिवसेना)  या खारबाव गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत.

तर समाज कल्याण सभापती पदी विराजमान झालेल्या नंदा उघडा (,भाजपा) या वैशाखरे गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आहेत. बांधकाम, आरोग्य  समिती सभापती पदी निवडून आलेले कुंदन पाटील ( शिवसेना) हे पूर्णा गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.तर संजय निमसे ( राष्ट्रवादी) हे चेरपोली गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.

Web Title: There is still no opposition in Thane Zilla Parishad; The election was held without any opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.