पाणी, स्वच्छतेचे महत्त्व सांगणारी व्हॅन फिरणार गावोगावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 01:56 AM2019-12-24T01:56:34+5:302019-12-24T01:56:53+5:30

राज्य शासनाचा उपक्रम : जिल्हा परिषदेचा पुढाकार

There is a van going around the water telling the importance of cleanliness | पाणी, स्वच्छतेचे महत्त्व सांगणारी व्हॅन फिरणार गावोगावी

पाणी, स्वच्छतेचे महत्त्व सांगणारी व्हॅन फिरणार गावोगावी

Next

ठाणे : स्वच्छ भारत मिशन ग्रामीणअंतर्गत राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची पाणी व स्वच्छतेविषयी जनजागृती करणारी एलईडी व्हॅन जिल्ह्यातील गावखेड्यांमध्ये धावणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष दीपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी हिरवा झेंडा दाखवून सोमवारी गावोगाव फिरण्यासाठी ही व्हॅन रवाना केली.

जिल्हा परिषदेच्या आवारात पार पडलेल्या या कार्यक्रमप्रसंगी आरोग्य व बांधकाम समिती सभापती वैशाली चंदे, महिला व बालकल्याणच्या सभापती सपना भोईर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि. नेमाने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे, शिक्षणाधिकारी शेषराव बढे आदी उपस्थित होते. त्यांनी तिला शुभेच्छा दिल्या.

दीडशे गावांत देणार संदेश
च्जिल्ह्यातील ग्रामस्थांमध्ये पाणी व स्वच्छतेविषयी जागृती निर्माण व्हावी. स्वच्छतेचे महत्त्व पटावे, यासाठी विविध जनजागृतीपर उपक्र म हाती घेण्यात आले आहेत. स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठीदेखील कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत.

च्या एलईडी व्हॅनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे दीडशे गावांतील शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायतींमधून पाणी व स्वच्छता विषयाचे माहितीपट, जाहिरात, लघुचित्रपट दाखवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Web Title: There is a van going around the water telling the importance of cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.