उल्हासनगरात भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती मिळाल्याने जल्लोष
By सदानंद नाईक | Published: October 8, 2022 05:38 PM2022-10-08T17:38:41+5:302022-10-08T17:38:50+5:30
उल्हासनगरात भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती मिळाल्याने जल्लोष करण्यात आला.
उल्हासनगर : महापालिकेने भांडवली कर मूल्य प्रणाली लागू केल्याने, मालमत्ताधारकांना दामदुप्पट मालमत्ता कर बिले येऊन नागरिकांत असंतोष निर्माण झाला. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती देताच भाजप, शिवसेना शिंदे गटासह अन्य पक्ष नेत्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त करीत जल्लोष केला.
उल्हासनगर महापालिका मालमत्ता कर विभागाने १ एप्रिल २०२२ पासून भांडवली कर मूल्य प्रक्रिया सुरू केली. भांडवली कर मूल्य प्रणाली प्रस्ताव मंजूर झाला तेंव्हा पासून वाढीव कर आकारल्याने, नागरिकांना दामदुप्पट मालमत्ता कर बिल आले. या प्रकाराने नागरिकांत असंतोष निर्माण झाला. महापालिका सार्वत्रिक निवडणुकी पूर्वी नागरिकांचा रोष नको म्हणून शिवसेना, भाजप, मनसे, रिपाई, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी राजकीय पक्षांसह सामाजिक संस्थेने भांडवली कर मूल्य प्रणाली रद्द करण्याची मागणी केली. काही जणांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. दरम्यान नागरिकांचा रोष बघून शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख अरुण अशान यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे भांडवली कर मूल्य प्रणाली बाबत माहिती दिली. शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन भांडवली कर मूल्य प्रणाली विरोधात शहरात निर्माण झालेल्या बाबत माहिती दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबधीत विभागाला याबाबत माहिती सादर करण्यास सांगून, भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती दिली. खासदार श्रीकांत शिंदे व अरुण अशान यांनी याबाबत माहिती दिल्यावर, सर्वच राजकीय पक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करून पेढे वाटत जल्लोष केला. तर नागरिकांनाही दिलासा मिळाला असून भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती न देता, प्रस्तावच रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षाचे माजी सभागृहनेते भारत गंगोत्री यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली. आमदार कुमार आयलानी, भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष जमनूदास पुरस्वानी, प्रकाश माखिजा आदींनी आमदार आयलानी यांच्या कार्यालयात पेढे वाटून जल्लोष केला. असाच जल्लोष खासदार श्रीकांत शिंदे यांच्या गोलमैदान येथील कार्यालयात करण्यात