धसई गाव 100 टक्के कॅशलेस होईल असा दावा केला नव्हता-रणजीत सावकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 09:15 PM2017-11-11T21:15:31+5:302017-11-11T21:15:42+5:30
भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहिर केल्यावर कॅशलेश इंडियाच्या दृष्टाने पाऊले उचलली गेली.
ऑनलाइन लोकमत
कल्याण- भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहिर केल्यावर कॅशलेश इंडियाच्या दृष्टाने पाऊले उचलली गेली. मुरबाड तालुक्यातील धसई हे गाव देशातील पहिले कॅशलेस गाव ठरले. मात्र काही कालवाधीनंतर कॅशलेस धसई गावचा दावा फोल ठरल्याच्या बातम्याही आल्या. प्रत्यक्षात धसई गाव हे 100 टक्के कॅशलेस होईल असा दावा केला नव्हता. तसेच कोणतेच गाव कॅशलेस होऊ शकत नाही, असे वक्तव्य स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी येथे केले.
कल्याण सुभेदार वाडा कट्टातर्फे ‘नोटबंदीनंतरची कॅशलेश इंडिया’ या विषयावर व्याख्याते सावरकर यांचे व्याख्यान आज सायंकाळी आयोजित करण्यात आले होते. यावेळी सावरकर यांनी उपरोक्त वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, धसई गावात 1क्क् टक्के व्यवहार हा कॅशलेस होईल असे म्हटले गेले होते. मात्र तसे झालेले नाही. तसा दावाही केला गेला नव्हता. गावात आजही व्यापारी डेबिट कार्डचा वापर करतात. जवळपास 8क्क् तरुणांना डेबिट कार्ड प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यामुळे कॅशलेश इंडियाच्या संकल्पनेत धसई हे गाव हे आजही मिनी इंडियाच आहे. ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांना डेबिट कार्ड देण्यामागचे धोकेही पंतप्रधान मोदी यांनी त्याचवेळी स्पष्ट केले होते. आजही ग्रामीण भागातील अदिवासी माणसाला डेबिट कार्ड घेण्यासाठी पदरचे 200 रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे त्याला डेबिट कार्ड परवडत नाही. त्यामुळे आदीवासी डेबीट कार्ड व बँक व्यवहाराच्या भानगडीत पडत नाही. याकडे सावरकर यांनी लक्ष्य वेधले.
सावरकर म्हणाले की, नोटबंदीनंतर लगेच रुपये कार्ड आले होते. आता भीम हे कार्ड सामान्य वापरतात. तसेच पेटीएम हे हे वॉलेट वापरले जाते. त्यात पैसे टाकावे लागतात. वापरलेले पैसे संपले की, पैसे टाकावे लागतात. भीम कार्डाचा वापर केल्यास त्यातून लगेच पैसे ट्रान्सफर होतात. त्याला 20 हजार रुपयांचे लिमीट आहे. समोरच्याकडे हे कार्ड नसल्यास तरी त्याचा वापर करता येतो. भीम कार्डाच्या वापराचे नोटिफिकेशन लगेच ग्राहकाला मिळते. त्यामुळे पालकांनी अशी एक भिती असते त्यांची मुले त्यांनी दिलेल्या पैशाचा वापर योग्य प्रकारे करतात की नाही. भीम कार्डाद्वारे त्यांच्या मुलांनी कुठे व कधी व कसा पैसा वापरला आहे. त्याच्या नोटिफिकेशनद्वारे कळून येईल. त्यामुळे पालकांना पाल्याकडून होणा:या आर्थिक व्यवहाराची चिंता सतावणार नाही. त्यामुळे भीम कार्ड जास्त वापरणो सोयीचे ठरेल. आत्ता मोबाईल व बँक खाते आधार लिंक असल्याने भविष्यात आधार कार्डद्वारेही पैसे काढता येतील अशी सोय येईल असे भाकित सावकर यांनी यावेळी व्यक्त केले.
केंद्रात व राज्यात भाजप सरकार आले. भाजप सरकारने नोटबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. भारतातील काळा पैसा बाहेर येईल. सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने अच्छे दिन येतील असा दावा करीत त्याच आश्वासनावर सत्तेचा सोपान गाठला. मात्र पाच वर्षात कसे काय अच्चे दिन येतील त्यासाठी सातत्याने सत्ता भाजपच्या हाती द्या असे आवाहन केले. नोटबंदीनंतर धसई गाव हे 100 टक्के कॅशलेस होईल असा दावा केला होता. या दावावर रणजीत सावरकर यांनी धसई शंभर टक्के कॅशलेस होईल असा दावा नव्हता असे वक्तव्य करुन अच्छे दिनच्याच उक्तीचा पुन: प्रत्यय नागरीकांना घडविला आहे.