खाजगी बसवर कारवाईसाठी वेळ नाही, आंदोलनानंतरही परिस्थिती जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 01:00 AM2017-12-06T01:00:41+5:302017-12-06T01:00:41+5:30

ठाणे पूर्वेतून सुटणा-या खाजगी बसच्या विरोधात कोपरीत आंदोलन झाल्यानंतरही आजही त्यांचा प्रवास सुसाट सुरू आहे.

There was no time for action on the private bus, even after the agitation, the situation was like that | खाजगी बसवर कारवाईसाठी वेळ नाही, आंदोलनानंतरही परिस्थिती जैसे थे

खाजगी बसवर कारवाईसाठी वेळ नाही, आंदोलनानंतरही परिस्थिती जैसे थे

googlenewsNext

ठाणे : ठाणे पूर्वेतून सुटणा-या खाजगी बसच्या विरोधात कोपरीत आंदोलन झाल्यानंतरही आजही त्यांचा प्रवास सुसाट सुरू आहे. महापालिकेने त्यांच्यावर कारवाईसाठी आरटीओकडे बोट दाखविले असतांना आता वाहतूक पोलिसांनीदेखील आरटीओलाच जबाबदार धरले आहे. असे असले तरी या बसना लगाम कोण घालणार असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
सहा महिन्यांपूर्वीदेखील समितीने कोपरी येथून होणाºया खाजगी बसच्या विरोधात आंदोलन उभारले होते. त्यानंतर त्या काही दिवसांसाठी का होईना बंद झाल्या होत्या. वाहतूक पोलीस आणि संबंधित आरटीओ प्रशासनानेदेखील यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आज आठ महिने उलटून गेल्यानंतरही त्या विरोधात कोणतीच कारवाई झालेली नाही.
कोपरीमध्ये आंदोलन झाल्यानंतर या बस बंद होतील असे वाटत होते. परंतु, आजही त्या सुसाट सुरूच आहेत. टीएमटीच्या बस थांब्यावर त्या उभ्या करू नका म्हणून परिवहनतर्फे कर्मचारी नेमले आहेत. तरी त्यांच्याशी हुज्जत घालून त्या थेट बसथांब्यावर उभ्या राहत आहेत.
कॅडबरी ब्रीज, नितीन कंपनी आणि तीनहातनाक्याजवळील ब्रीजच्या चढणीवर आणि उताराला रस्त्याच्या मधोमध त्या उभ्या केल्या जात आहे. अचानक त्या उभ्या राहत असल्याने अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.
हायवेला सर्वच वाहने सुसाट असतात, परंतु अशा पद्धतीने कुठेही कसेही प्रवासी घेणे आणि उतरविणे यामुळे इतर वाहन चालकांबरोबर प्रवाशांचा जीवदेखील धोक्यात घालण्याचा प्रकार त्यांच्याकडून होत आहे.
दरम्यान, या बसेसवर कारवाई व्हावी म्हणून परिवहनच्या बैठकीत देखील चर्चा झाली होती. परंतु, आरटीओकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देऊन परिवहन प्रशासनाने त्यांच्यावर कारवाईचे अधिकारही त्यांनाच असल्याचे सांगितले होते. तरीही या प्रकरणात काहीच होताना दिसत नाही.

Web Title: There was no time for action on the private bus, even after the agitation, the situation was like that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.