कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ५८ बेकायदा बांधकामे जैसे थे, आदेश होऊनही वर्षभरात कारवाई होईना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 05:42 PM2018-01-24T17:42:04+5:302018-01-24T17:42:22+5:30
केडीएमसी ई प्रभागातील नांदीवली आणि आजुबाजुच्या परिसरात बिनदिककतपणो उभ्या राहीलेली ५८ बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश होऊनही गेले वर्षभर याबाबत कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही.
डोंबिवली - केडीएमसी ई प्रभागातील नांदीवली आणि आजुबाजुच्या परिसरात बिनदिककतपणो उभ्या राहीलेली ५८ बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश होऊनही गेले वर्षभर याबाबत कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी दुपारी आयुक्त पी वेलरासू यांची भेट घेतली. यात संबंधित बांधकामांवर कारवाईचे आश्वासन आयुक्तांकडून देण्यात आले असलेतरी या प्रभागासाठी सक्षम अधिकारी महापालिकेला सापडत नसल्याचे चर्चेतून समोर आले आहे.
केडीएमसीतील अ, आय, ई आणि ह प्रभागांमध्ये मोठया प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभी राहीली आहेत. नवीन उभी राहणारी बांधकामे देखील प्रशासनाकडून थोपविली जात नसल्याने या बांधकामांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत आहे. ई प्रभागाचे प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार यांना बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात टाळाटाळ केल्याप्रकरणी नुकतेच निलंबित करण्यात आले आहे. आता या प्रभागाचा पदभार जे 4 प्रभागाचे प्रभारी प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे यांच्याकडे अतिरिक्त म्हणून सोपविण्यात आला आहे. ई प्रभागामध्ये बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झाला असताना एकाच अधिका-याकडे दोन प्रभागांचा पदभार देऊन आयुक्तांनी काय साधले? असाही सवाल उपस्थित होत आहे. बेकायदा बांधकामांचे माहेरघर म्हणून ई प्रभागाकडे पाहिले जाते. महापालिकेतील काही वरीष्ठ अधिका-यांची या उभ्या राहणा-या बांधकामांमध्ये अप्रत्यक्षरित्या भागिदारी असल्याने कारवाईसाठी गेलेल्या प्रभाग अधिका-यांवर दबाव येत असल्याची सुत्रंची माहीती आहे. कारवाईसाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त मिळत नाही अशीही ओरड प्रशासनाकडून सुरू असते परंतू आमच्याकडून वेळोवेळी बंदोबस्त पुरविला गेला आहे असे पोलिस विभागाचे म्हणणो आहे. दरम्यान याठिकाणचा पदभार सांभाळणा-या अधिका-यांवर नेहमीच कारवाईची टांगती तलवार असते त्यामुळे प्रभाकर पवार यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर कोणीही सक्षम अधिकारी या प्रभागाचा कारभार हाताळण्यासाठी पुढे येत नसल्याचे बोलले जाते. बुधवारी आयुक्तांबरोबर राष्ट्रवादी पदाधिका-यांनी केलेल्या चर्चेत सक्षम अधिकारी मिळत नसल्याने याठिकाणी सद्यस्थितीला अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्याचे समोर आले. नांदीवली आणि आसपासच्या परिसरात वर्षभरात ५८ बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश देण्यात आले होते परंतू त्यावर कोणतीच कारवाई झाली नसल्याकडे संबंधित पदाधिका-यांकडून लक्ष वेधण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सरचिटणीस समीर भोईर, डोंबिवली कार्याध्यक्ष राजेंद्र नांदोस्कर, सरचिटणीस जगदीश ठाकूर, उपाध्यक्ष प्रसन्न अचलकर आदिंनी आयुक्तांशी चर्चा केली. यात अशा बांधकामांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असून नव्याने बांधकामे होणार नाहीत याची दक्षता घेऊ असे आयुक्तांकडून सांगण्यात आले अशी माहीती नांदोस्कर यांनी दिली.