दिव्यातील ३२५ कुटुंबे येणार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:49 AM2019-09-15T00:49:11+5:302019-09-15T00:50:30+5:30

खारफुटींची कत्तल करून त्यावर उभारलेल्या इमारती आणि चाळींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला दिले होते.

There will be 3 families in the light to open | दिव्यातील ३२५ कुटुंबे येणार उघड्यावर

दिव्यातील ३२५ कुटुंबे येणार उघड्यावर

Next

ठाणे : खारफुटींची कत्तल करून त्यावर उभारलेल्या इमारती आणि चाळींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला दिले होते. त्यानुसार, शनिवारी सुटीच्या दिवशी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तामध्ये दिव्यात कारवाई केली. सुरुवातीला नागरिकांनी या कारवाईस विरोध केला. मात्र, अनेकांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले असून त्या पाच इमारती, चाळी अशा तब्बल ३२५ कुटुंबांचे पाणी आणि वीजपुरवठा खंडित केला. तसेच या इमारती आणि चाळींना जाणाऱ्या जलवाहिन्या काढल्या असून पंपही जप्त केले आहेत. आता या इमारतींवर मंगळवारनंतर हातोडा टाकण्यात येणार आहे.
मुंब्य्रातील माहिती अधिकार कार्यकर्ते इराकी आरीफ नवाज यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार, काही दिवसांपूर्वी यावर सुनावणी होऊन दिवा आणि मुंब्य्रातील अशा प्रकारे खारफुटींची कत्तल करून उभारलेल्या बांधकामांवर कारवाईचे आदेश पालिकेला दिले होते.
त्यानुसार, शनिवारी साप्ताहिक सुटीच्या दिवशीच उपायुक्त मनीष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली १८० पोलीस बंदोबस्तासह महापालिकेचे १२ अधिकारी आणि इतर पथके दिव्यात दाखल झाली. परंतु, या सर्वांना दिव्यात शिरण्यापासून संतप्त रहिवाशांनी रेल्वेफाटकाजवळच रोखले होते. त्यामुळे काही काळ वादंग निर्माण झाला होता. तो दुपारपर्यंत सुरूच होता. त्यामुळे अशांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती उपायुक्त जोशी यांनी दिली.
काही काळानंतर संतप्त जमावातून मार्ग काढून पालिकेचे पथक दिव्यातील त्या पाच इमारतींच्या ठिकाणी पोहोचले़ यावेळी या पथकामार्फत या इमारतींसह खारफुटींची कत्तल करून उभारलेल्या चाळीचे पाणी आणि वीजपुरवठा खंडित केला़ या ठिकाणी ३२५ कुटुंबांचे वास्तव्य असल्याची माहिती पालिकेने दिली.
>मंगळवारनंतर बांधकामांवर पडणार हातोडा
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून अचानकपणे शनिवारी ही कारवाई झाल्याने मोठ्या कष्टाने हक्काचे घर घेणाऱ्यांचे मात्र यामुळे चांगलेच हाल झाल्याचे दिसून आले. तर, एका स्थानिकाच्या बंगल्याचेही पाणी, वीज कनेक्शन खंडित केले आहे. दरम्यान, आता येथील रहिवाशांना घरे रिकामी करण्याचे आवाहन केले. मंगळवारपासून या बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे.

Web Title: There will be 3 families in the light to open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.