शैक्षणिक जगताच्या बदलत्या परिस्थितीवर होणार चर्चा; ठाण्यात राष्ट्रीय संमेलन

By प्रज्ञा म्हात्रे | Published: April 11, 2023 05:51 PM2023-04-11T17:51:33+5:302023-04-11T17:52:02+5:30

ठाण्यात १३ एप्रिल रोजी एकदिवसीय राष्ट्रीय संमेलन

There will be a discussion on the changing situation of the educational world | शैक्षणिक जगताच्या बदलत्या परिस्थितीवर होणार चर्चा; ठाण्यात राष्ट्रीय संमेलन

शैक्षणिक जगताच्या बदलत्या परिस्थितीवर होणार चर्चा; ठाण्यात राष्ट्रीय संमेलन

googlenewsNext

प्रज्ञा म्हात्रे

ठाणे : महाराष्ट्रातील सर्व मत निर्माते आणि शिक्षणतज्ञांना एकत्र आणण्यासाठी एनईपीच्या युगात शैक्षणिक जगताच्या बदलत्या परिस्थितीवर चर्चा व विचारमंथन करण्यासाठी आयस्कॉलर नॉलेज सर्व्हीस प्रा. लि, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृह येथे गुरुवार १३ एप्रिल रोजी एक दिवसीय राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन केले आहे.

या महापालिकेत ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळांचे मुख्याध्यापक व संस्थाचालक किंवा त्यांचे प्रतिनिधी तसेच मुंब्रा, कळवा कार्यक्षेत्रातील शाळांचे मुख्याध्यापक हे उपस्थित राहणार आहे. १३ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ यावेळेत संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंग देओल, एससीईआरटी शालेय शिक्षण विभागाचे संचालक कौस्तुभ दिवेगांवकर, शिक्षण विभागाचे आयुक्त सूरज मांढरे, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि ठाणे मनपाचे आयुक्त अभिजीत बांगर हे या कार्यक्रमात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत विशेष मार्गदर्शन करणार आहेत.

अध्यक्ष आणि उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रमुख पाहुणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. संजय केळकर, आ.निरंजन डावखरे, आ. प्रताप सरनाईक, ज्येष्ठ लेखक, शिक्षणतज्ञ डॉ. प्रा. प्रदीप ढवळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग सह सचिव इम्तियाज काझी, आयकेएसपीएलचे संस्थापक आर. पी. नडेला, सह संस्थापक विवेक ओबेरॉय आणि असोशिएट सुशिल वाघुले आणि हरीश मिश्रा हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत.

Web Title: There will be a discussion on the changing situation of the educational world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.