राज्यातील शहरांची स्वच्छता, हिरवळीचेही होणार मोजमाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 04:32 AM2020-03-01T04:32:37+5:302020-03-01T04:32:41+5:30

येत्या १ मे २०२० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

There will be a measure of cleanliness and greenery of the cities in the state | राज्यातील शहरांची स्वच्छता, हिरवळीचेही होणार मोजमाप

राज्यातील शहरांची स्वच्छता, हिरवळीचेही होणार मोजमाप

Next

नारायण जाधव 
ठाणे : येत्या १ मे २०२० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याचे औचित्य साधून नगरविकास
विभागाने राज्यातील शहरे चकाचक व्हावीत, स्वच्छ महाराष्ट्र अथवा स्वच्छ भारत मिशनला चालना मिळावी, यासाठी राज्यातील सर्व शहरांसाठी १ मार्च ते ३० एप्रिल २०२० या दोन महिन्यांच्या काळात ‘हीरक महोत्सवी महाराष्ट्र नागरी स्वच्छता अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या काळात शहरांची केवळ स्वच्छताच नव्हे, तर त्यात सुंदरता व हिरवळीचेही मोजमाप केले जाणार आहे. यासाठी सर्व शहरांना घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासह आपल्या हद्दीतील रस्ते, चौक, वाहतूक बेटांसह उद्याने अधिकाधिक स्वच्छ, हरित, सुंदर दिसावीत, यासाठी स्पर्धा आयोजिली आहे.
>ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रावर भर
स्वच्छता अभियानात घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनावर भर देण्यात येत होता. मात्र, या हीरक महोत्सवी महाराष्ट्र अभियानात सर्व शहरांच्या प्रशासनाला त्यांच्या शहरांतील नाल्यांची सफाई करून ते स्वच्छ करण्यास सांगण्यात आले आहे. यात नागरिकांना सहभागी करून त्यांना त्यात कचरा टाकण्यास परावृत्त करणे, उड्डाणपुलाखालील जागा स्वच्छ करून त्यात आकर्षक उद्यान विकसित करणे, शहरांतील जाहिरात फलक काढणे, उद्यानांचे सुशोभीकरण करून त्यात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा उभारण्यास सांगण्यात आले आहे.
फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा
देशात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यास सर्वच शहरांना सांगण्यात आले आहे. मात्र, कोठेही ती झालेली नाही. नेमके हेच हेरून या हीरक महोत्सवी अभियानात सर्वच शहरांच्या आयुक्त/मुख्याधिकाऱ्यांना त्यांच्या शहरांत फेरीवाला झोन तयार करून त्यात फेरीवाल्यांना बसण्यास प्रवृत्त करून इतर ठिकाणच्या फेरीवाल्यांना हटविण्यास सांगण्यास आले आहे.
>‘अमृत अभियानासह चौदाव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करा’
‘हीरक महोत्सवी महाराष्ट्र नागरी स्वच्छता अभियान’अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना जो खर्च करावा लागणार आहे, तो चौदाव्या वित्त आयोगाकडून मिळणाºया निधीतून स्वच्छ महाराष्ट्र राखीव ठेवलेल्या ५० टक्के रक्कम अथवा अमृत अभियानांतर्गत मिळणाºया अनुदानातून खर्च करण्यास सांगण्यात आले आहे.

Web Title: There will be a measure of cleanliness and greenery of the cities in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.