सेनेत आता आणखी वाद पेटणार?

By admin | Published: March 11, 2016 02:33 AM2016-03-11T02:33:42+5:302016-03-11T02:33:42+5:30

ठाणे महापालिकेत सध्या शिवसेनेची सत्ता आहे. परंतु, सेनेच्या नगरसेवकांची गाऱ्हाणी मांडण्यासाठी महापालिकेत खमक्या असा एकही पदाधिकारी नाही.

There will be more controversy in the Senate? | सेनेत आता आणखी वाद पेटणार?

सेनेत आता आणखी वाद पेटणार?

Next

ठाणे : ठाणे महापालिकेत सध्या शिवसेनेची सत्ता आहे. परंतु, सेनेच्या नगरसेवकांची गाऱ्हाणी मांडण्यासाठी महापालिकेत खमक्या असा एकही पदाधिकारी नाही. त्यामुळे प्रत्येक महासभेला विरोधक हे सत्ताधाऱ्यांवर हावी होत असल्याचेच दिसत आहे. विशेष म्हणजे सभागृहात समतोल राखण्याची जबाबदारी असणाऱ्या सभागृहनेत्या या विविध मुद्यांवर सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर फारशी खमकी भूमिका बजावत नसल्याने पक्षासह इतर नगरसेवकांच्या अडचणींत मात्र भर पडत असल्याचे मत आता शिवसेनेचेच नगरसेवक व्यक्त करू लागले आहेत. अनेक प्रस्तावांच्या फायलींवर सभागृहनेत्यांची स्वाक्षरी होणे अपेक्षित असताना त्यावरदेखील अद्याप स्वाक्षरी न झाल्याने काही महत्त्वाचे प्रस्ताव अद्यापही मार्गी लागले नसल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या इतर नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे.
ठाणे महापालिकेत सत्ता असूनही अनेक मुद्यांवर शिवसेनेचे नगरसेवक झगडताना दिसत आहेत. पाणीप्रश्न असो अथवा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा प्रश्न, कळवा रुग्णालयाचा प्रश्न असो, शहरातील धोकादायक इमारतींचा, ठामपाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे टॅब असो, परिवहन सेवेचा प्रश्न असो, यावर महापालिकेत कोणताही ठोस असा निर्णय होताना दिसला नाही. मुळात या मुद्यांवर नेमकी काय भूमिका घ्यायची, यावर सेनेचे नगरसेवक गोंधळलेले आहेत. अशा परिस्थितीत सुवर्णमध्य काढून खंभीर अशी भूमिका घेण्याचे काम हे सभागृहनेत्याचे मानले जाते. मुळात याच ठिकाणी विद्यमान सभागृहनेत्या कमी पडत असल्याचा आरोप शिवसेनेच्या काही ज्येष्ठ नगरसेवकांनी व्यक्त केला आहे. याबाबत, आपल्या पक्षातील नगरसेवकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्याची भूमिका सभागृहनेत्यांची असते. परंतु, आजच्या घडीला असा संवाद सेनेच्या नगरसेवकांमध्ये आणि सभागृहनेत्यामध्ये होताना दिसत नाही. अगदी नगरसेविकांशीही असा संवाद होताना दिसत नाही. त्याही त्यांच्यापासून लांब राहण्यातच धन्यता मानत असल्याचे चित्र आहे.
मागील सहा महिन्यांपासून महासभेत मंजूर झालेल्या अनेक प्रस्तावांच्या फायलींवरही सभागृहनेत्यांच्या स्वाक्षरी न झाल्याने ते प्रस्तावही मार्गी न लागल्याने अनेक नगरसेवकांत त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर उमटू लागला आहे. एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण भूमिका मांडणे गरजेचे असताना केवळ काहीतरी बोलून वेळ मारून नेतानाच त्या दिसून येतात. परिणामी, सभागृहात पक्षाची अशी भूमिका अभ्यासपूर्णरीत्या मांडणाऱ्या एखाद्या सदस्याची या पदावर निवड करावी, अशी मागणी आता पक्षाचे सदस्य स्थानिक नेतृत्वाकडे करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: There will be more controversy in the Senate?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.