म्हसा यात्रेत यंदा पशुपक्षी प्रदर्शन नसणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 02:01 AM2020-01-08T02:01:23+5:302020-01-08T02:01:26+5:30
जिल्हा परिषदेने म्हसा यात्रेत शेतकऱ्यांना उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते पशुपक्षी प्रदर्शनाचे उद््घाटन झाले होते.
मुरबाड : मागील वर्षी जिल्हा परिषदेने म्हसा यात्रेत शेतकऱ्यांना उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते पशुपक्षी प्रदर्शनाचे उद््घाटन झाले होते. मात्र या प्रदर्शनात भ्रष्टाचार उघड झाल्याने तो दडपण्यासाठी यंदाच्या यात्रेत हे प्रदर्शन नसेल. १० जानेवारीपासून म्हसा यात्रा सुरू होत असून जि.प.च्या कारभाराबाबत शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. हा भ्रष्टाचार दडपण्यासाठीच प्रदर्शन भरविले जात नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव यांनी केला आहे.
म्हसा यात्रेत इतर राज्यातून लाखो शेतकरी येत असल्याने खिल्लारी बैलांची खरेदी विक्र ी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या यात्रेत खिल्लारी बैलांचे एक प्रकारे प्रदर्शन बघायला मिळते. म्हणून जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करु न राज्यातील शेतकºयांना शेती व्यवसायाबरोबर दुग्धव्यवसाय, तसेच कुक्कुटपालन, शेळी पालन हे व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळावी व त्यांंचा आर्थिक विकास व्हावा म्हणून राज्यस्तरावर म्हसा यात्रेत पशुपक्षी प्रदर्शन सुरू केले.
या प्रदर्शनात वेगवेगळ््या संकरित गायी, म्हशी, शेळ््या, बोकड, मेंढ्या, खिल्लारी बैल, घोडे घेऊन सहभागी झालेल्या शेतकºयांना प्रवास खर्च, दोन दिवसाचे जेवण तसेच मानधन व प्रगतशील शेतकरी म्हणून मंत्र्यांकडून सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देण्याचे गेल्यावर्षी जाहीर केले होते. यामुळे शेतकरी जनावरे, कोंबड्या घेऊन यात्रेत सहभागी झाले होते.
हे प्रदर्शन प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येईल त्यासाठी जिल्हा परिषदेचे योग्य मार्गदर्शन घेतले जाईल. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्या पाठीवर जानकर यांनी शाबासकीची थाप मारली होती. मात्र शेतकºयांच्या हितासाठी झालेल्या प्रदर्शनात पशुसंवर्धन विभागाने स्वत: चे हित साधले आहे. शेतकºयांना जेवण तसेच नाश्ता, चहापान देण्यासाठी निसर्ग कॅटरर्स ही एजन्सी मुरबाड तालुक्यातील कान्होळ गावातील असल्याचे नमूद केले असले तरी ही एजन्सी तसेच डेकोरेशनची एजन्सी या तालुक्यात अस्तित्वात नसल्याने हा खर्च पशुसंवर्धन विभागाने कुणाच्या नावे दिला हे मात्र गुलदस्त्यातच आहे. यामुळे प्रदर्शनात ठाणे जिल्हा परिषदेने घोटाळा केला असून तो दडपण्यासाठी या वर्षी म्हसा यात्रेत पशुपक्षी प्रदर्शन भरणार नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हिंदुराव यांनी केला आहे.
जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण पवार हे रजेवर गेले असल्याने त्यांचा अतिरिक्त कार्यभार माझ्याकडे सोपविण्यात आला आहे. माझ्याकडे अतिरिक्त कार्यभार असल्याने म्हसा यात्रेत पशुपक्षी प्रदर्शन भरविण्याच्यादृष्टीने मला वरिष्ठांनी आदेश दिलेले नाहीत. - डॉ. सुभाष पाठारे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी