मार वाचवण्यासाठी त्यांनी केले पलायन

By admin | Published: February 17, 2017 02:03 AM2017-02-17T02:03:49+5:302017-02-17T02:03:49+5:30

ज्या पालकांच्या भीतीने घर सोडले, त्यांचाच सहवास आणि मायेच्या उबेपासून पोरके झाल्यावर जणू त्यांच्यावर आभाळ कोसळल्याने

They did escape to save the kill | मार वाचवण्यासाठी त्यांनी केले पलायन

मार वाचवण्यासाठी त्यांनी केले पलायन

Next

ठाणे : ज्या पालकांच्या भीतीने घर सोडले, त्यांचाच सहवास आणि मायेच्या उबेपासून पोरके झाल्यावर जणू त्यांच्यावर आभाळ कोसळल्याने रडणाऱ्या १० आणि १२ वर्षीय दोन चिमुरड्यांना ठाणे गुन्हे शाखेच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटला स्वगृही धाडण्यात यश आले आहे. ही मुले ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून बेपत्ता झाली असतानाही हे आपले काम नाही, असे न म्हणता, ठाणे शहराने आपली जबाबदारी ओळखून त्यांची त्यांच्या पालकांशी पुन:र्भेट घडवून आणली. यानिमित्ताने शहर पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन पाहण्यास मिळाले.
ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याण तालुक्यातील टिटवाळा येथील म्हारळ हे गाव. या गावातील गरीब कुटुंबातील दोन मुले ३ फेब्रुवारी रोजी अचानक बेपत्ता झाली. शोध घेऊनही सापडत नसल्याने त्यांच्या पालकांनी ५ फेब्रुवारीला टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, अपहरणाचा गुन्हा नोंदवला होता. याचदरम्यान, ठाणे शहर पोलिसांचे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट मानखुर्द येथील बालसुधारगृहात दुसऱ्या एका प्रकरणी तपास कामी गेले असताना, ही मुले रडताना, या पथकाला दिली.
पथकाने त्यांच्याबद्दल विचारणा केली असता, ते काही सांगत नसल्याचे बालगृहाकडून सांगण्यात आले. या वेळी पथकाने त्यांची चौकशी करताना, ते पोपटाप्रमाणे बोलू लागले.
अवघ्या चार दिवसांत ती मुले स्वगृही परतली आहेत. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अडसुळे, पोलीस उपनिरीक्षक एस.जे. सोनावणे यांच्या पथकातील पोलीस हवालदार एच.एस. घोरपडे, पोलीस नाईक प्रमोद पालांडे आणि रोशनी सावंत यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: They did escape to save the kill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.