ना हातात बसतात, ना खिशात मावतात; असे मोबाइल चोरट्यांना सोयीचे ठरतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:45 AM2021-08-17T04:45:39+5:302021-08-17T04:45:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे: केवळ नवीन फिचर्स आले. काहीतरी वेगळे आहे. नामांकित कंपनीचा आहे. म्हणून हातात किंवा खिशात न ...

They do not fit in the hand, nor do they fit in the pocket; Such mobiles are convenient for thieves | ना हातात बसतात, ना खिशात मावतात; असे मोबाइल चोरट्यांना सोयीचे ठरतात

ना हातात बसतात, ना खिशात मावतात; असे मोबाइल चोरट्यांना सोयीचे ठरतात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: केवळ नवीन फिचर्स आले. काहीतरी वेगळे आहे. नामांकित कंपनीचा आहे. म्हणून हातात किंवा खिशात न मावणारेही मोबाइल घेण्याची फॅशन वाढली आहे. यातूनच ते चोरीचेही प्रकार वाढले आहेत. गेल्या दीड वर्षात ४४२ मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांची ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात नोंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे, रिक्षातून प्रवास करणारे तसेच पायी जाणाऱ्यांकडूनही मोबाइल हिसकावण्याचे तसेच बसमध्ये प्रवास करतानाही चोरीचे प्रमाण वाढले आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेटमधील ३५ पोलीस ठाण्यांमध्ये २०२० मध्ये मोबाइल चोरीचे २१५ गुन्हे नोंद झाले. यात २७९ मोबाइलची चोरी झाली. त्यातील ३० मोबाइल परत मिळविण्यात गुन्हे अन्वेषण विभागासह स्थानिक पोलिसांना यश आले.

* चोरी नव्हे, गहाळ म्हणा -

काही दिवसांपूर्वी माजीवडानाका येथून बसने जाणाऱ्या प्रवाशाचा मोबाइल चोरीस गेला. तक्रार घेऊन तो राबोडी पोलीस ठाण्यात गेला. तेव्हा चोरीची नव्हे तर केवळ मिसिंगची तक्रार पोलिसांनी घेतली. यात या व्यक्तीने खूप आग्रह धरल्यानंतर चोरीची तक्रार दाखल झाली, पण राबोडीच नव्हे तर अनेक ठिकाणी पोलीस चोरी किंवा जबरी चोरीऐवजी मिसिंगची तक्रार दाखल करतात. यातूनच चोरांचेही फावते, हीदेखील गंभीर बाब आहे.

*या भागात सांभाळा मोबाइल-

तीनहातनाका ते घोडबंदर रोडवरील कापूरबावडी परिसरातील रस्त्यावर तसेच मुंब्रा आणि वागळे इस्टेटमध्ये मोबाइल चोरीबरोबर जबरी चोरीच्या घटना अधिक आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाइल चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी विशेष पथकांची निर्मिती केली आहे. अलीकडेच नौपाडा पोलिसांनी भिवंडीतून दोन अट्टल चोरट्यांना अटक केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी दिली.

..................

*अधिक सतर्क राहणेही आवश्यक-

सध्या महागड्या मोबाइलवर सोशल मीडियाच्या साइटस् न्याहाळण्यात अनेकजण व्यस्त असतात. अशावेळी त्यांची मोबाइलवरील पकड सैल होते. काही मोबाइल हे हातात मावणारेही नसतात. हीच संधी चोरटे साधतात. अशा चोऱ्या रोखण्यासाठी मोक्कासारखी कडक कारवाई करण्याचाही विचार सुरू आहे, पण नागरिकांनीही सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

- संजय येनपुरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर

* शहरातील मोबाइल चोरीच्या घटना

२०१९ - आकडेवारी उपलब्ध नाही

२०२० - २७९

२०२१ (३० जूनपर्यंत) - १६३

Web Title: They do not fit in the hand, nor do they fit in the pocket; Such mobiles are convenient for thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.